Last Updated: Monday, April 16, 2012, 08:09
www.24taas.com, सिडनी मासे तसंच बदाम खाल्यास कँसर धोका कमी होतो, असा नवा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. कारण, या खाद्यपदार्थांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड जास्त प्रमाणात असतं. कँसर पहिल्या पातळीवर असेल, तर हे अॅसिड कँसर रोखून धरतं.
सिडनी युनिव्हर्सिटीच्या एका संशोधक पथकाने यावर अभ्यास केला. अभ्यासा अंती त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे, मासे आणि बदाम कँसर पसरण्यापासून बचाव करतात. शास्त्रज्ञ स्तनांचा कँसरच्या पेशींचे परीक्षण करत होते. यातील ओमेगा फॅटी अॅसिडची भूमिका तपासत होते.
“स्तनांचा कँसर हा जीवघेणा असतो आणि यावर अद्याप कोणताही उपचार सापडलेला नाही” असं या पथकाचं नेतृत्व करणाऱ्या डॉ. मायकल मुरे यांनी सांगितलं. पण ओमेगा अॅसिड या कँसरला रोखण्यात सैनिकाची भूमिका बजावतं, असंही ते म्हणाले. टूना आणि सालमन या माशांमध्ये या अॅसिडचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे आहारात या माशांचा अधिक वापर करावा. पथकातील संशोधक याचा अभ्यास करत आहेत.
First Published: Monday, April 16, 2012, 08:09