डार्क चॉकलेट आरोग्यासाठी फायदेशीर - Marathi News 24taas.com

डार्क चॉकलेट आरोग्यासाठी फायदेशीर

www.24taas.com, वॉशिंग्टन
 
डार्क चॉकलेट आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. हे वाचून कदाचित आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. भरपूर डार्क चॉकलेट खाल्याने रक्तदाब कमी होणं, रक्त प्रवाह कमी होणं यांसारख्या विकारांचा धोका कमी होतो.
 
एका नव्या संशोधनातून हे सिद्ध झालंय. याशिवाय पेशींना सेल्युलर डीएनए मध्ये परिवर्तित करण्यासाठीही डार्क चॉकलेट्सची मदत होते. कॅसरचा धोका कमी करण्यासाठीही डार्क चॉकलेट उपयोगी पडतं.या बाबतीत संशोधन करण्यासाठी अमेरिकेतील सॅन दिएगो युनिव्हर्सिटीत एक प्रयोग करण्यात आला. १५ दिवस एका पथकातील लोकांना ७०% कोको असणारी चॉकलेट्स खायला दिली. तर दुसऱ्या समुहाला व्हाइट चॉकलेट्स.
 
युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार कोको चॉकलेट खाणाऱ् पथकातील लोकांचमधील कॅलेस्ट्रॉल कमी झालं होतं. ग्लुकोजची मात्राही कमी झाली होती. शास्त्रज्ञांच्या मते डार्क चॉकलेट खाल्यामुळे लिपिड प्रोफाईल योग्य राहातं.

First Published: Friday, April 27, 2012, 23:32


comments powered by Disqus