Last Updated: Thursday, May 3, 2012, 21:02
www.24taas.com, लंडन लसूण आरोग्यासाठी चांगली असून आहारात लसूण असेल, तर अन्नामध्ये विषारी तत्व निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाला प्रतिबंध होतो असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. आहारात लसणीचा वापर अँटी-बायोटिक औषधांपेक्षाही अधिक परिणामकारक ठरतो असं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
वॉशिंग्टन विश्वविद्यालयच्या शास्त्रज्ञांनी असा शोध लावला आहे की लसणीमध्ये डाइलिल सल्फाइड अन्नातील विषाणूंची साखळी तोडतं. याच बरोबर लसूण औषधांपेक्षाही जास्त प्रभावी असून परिणामही ताबडतोब करते. जर्नल ऑफ अँटीमायक्रोबियल केमोथेरपी या पुस्तिकेमध्ये असं लिहीण्यात आलंय, की अन्न आणि मांस यांना विषारी बनण्यापासून लसूण बचाव करते.
डेली मेल वृत्तपत्राशी बोलताना शास्त्रज्ञ मायकल कोनकेल म्हणाले, "ही खरंच गमतीदार गोष्ट आहे. आम्हाला संशोधनात आढळून आलं की लसूण जेवणातीलच नाही तर पर्यावरणालाही दूषित होण्यापासून वाचवते."
First Published: Thursday, May 3, 2012, 21:02