Last Updated: Sunday, September 16, 2012, 16:15
www.24taas.com, लंडनपांढऱ्या लुसलशीत पावामुळे आपलं वजन वाढेल, अशी भीती बाळगून तुम्ही आपल्या आहारातून पांढरा पाव हद्दपार केला असेल, तर पुन्हा पाव खाणं सुरू करा. कारम, शास्त्रज्ञांच्या मते पांढऱ्या पावांमध्ये अनेक महत्वाची जीवनसत्वं असतात.
‘द सन’मध्ये आलेल्या बातमीनुसार ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी पांढरा पाव हा आरोग्यासाठी महत्वाचा असल्याचा दावा केला आहे. मध्य ब्रिटनमधील ब्रिटिश न्युट्रिशन फाउंडेशनचे आहार विशेषज्ञ डा एनी ओकोनोर यांनी नव्या अभ्यासानुसार असं सांगितलंय, की पांढऱ्या पावाबद्दल उगीचच अपप्रचार झालेला आहे.
ओकोनर म्हणाले, की पावातून होणार पोषम अत्यंत आवश्यक आहे. पाव खाल्ल्याने वजन वाढतं हा गैरसमज आहे. ज्या प्रमाणे ब्राऊन ब्रेड हा पोषक असतो, तसाच गव्हाचा पांढरा ब्रेडही आरोग्यासाठी पोषक असतो.
First Published: Sunday, September 16, 2012, 16:15