Last Updated: Tuesday, January 28, 2014, 21:42
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमहिला आयोगाच्या सदस्या आशा मिर्गे यांनी महिलांविषयी केलेलं वक्तव्य वादग्रस्त ठरलं आहे. मुली आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी मुलींचे कपडे तसेच वागणं आणि अयोग्य ठिकाणी जाणं या तीन गोष्टी करणीभूत असतात, असं वादग्रस्त वक्तव्य आशा मिर्गे यांनी केलं आहे.
आशा मिर्गे यांनी आपलं हे मत नागपुरात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या युवती शिबिरात व्यक्त केलं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या.
महिला आयोगाच्या सदस्यांनी महिलांविषयी केलेल्या या वक्तव्यामुळे सर्वच अवाक झाले आहेत. महिलांवरील अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी महिला आयोग महिलांमागे असतो, मात्र महिला आयोगाचे विचार असे असतील, तर अन्याय झाल्यावर महिलांनी जायचं कुठे? हा सवाल उपस्थित होत आहे.
आशा मिर्गेचं वादग्रस्त वक्तव्य आणि सवालआशा मिर्गे यांना महिला सुरक्षा आणि बलात्कारावर प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देतांना त्यांनी मुंबईतील शक्तीमील बलात्कार प्रकरण आणि दिल्लीतील निर्भया प्रकरणाची उदाहरणं दिली. मात्र महिला आयोग सदस्यांचीही उत्तर अजब वाटली.
मुंबईतील पीडित मुलीने शक्तीमिलमध्ये जाण्याची काय गरज होती. दिल्लीतील निर्भयाला मित्राबरोबर चित्रपट पाहण्यासाठी जाण्याची गरज काय होती, असा सवाल करत अजब उत्तरं दिली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो
First Published: Tuesday, January 28, 2014, 16:51