Last Updated: Wednesday, October 9, 2013, 22:01
www.24taas.com, झी मीडिया, पुणेपुण्याच्या एस पी कॉलेजमध्ये अॅडमिशन घोटाळा समोर आलाय. अकरावीच्या वर्गात तब्बल ९६ विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे प्रवेश देण्यात आले आहेत.
केंद्रीय प्रवेश समितीला अंधारात ठेवून राबवण्यात आलेली ही प्रवेश प्रक्रिया रद्द होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे आज विद्यार्थी संघटनानी कॉलेजमध्ये चांगलाच गोंधळ घातला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी कॉलेजमध्ये आलेल्या सहाय्यक शिक्षण उपसंचालकांना विविध राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला. संपूर्ण दिवसभर हा गदारोळ सुरु होता.
दरम्यान या प्रकरणी एस पी च्या संस्थाचालकांनी कॉलेजचे प्राचार्य दिलीप शेठ यांचा राजीनामा घेतला आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, October 9, 2013, 21:59