गुप्तचर यंत्रणेत सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारीच्या 750 जागा ASSISTANT CENTRAL INTELLIGENCE OFFICER

गुप्तचर यंत्रणेत सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी- 750 जागा

गुप्तचर यंत्रणेत सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी- 750 जागा
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

केंद्रीय गृह विभागाच्या गुप्तचर यंत्रणेत सहायक केंद्रीय गुप्तचर अधिकारी/एक्झिक्युटिव्ह (750 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑगस्ट 2013 आहे.

या पदासाठी १८ ते २७ वर्षं वयोगटातील व्यक्ती पात्र ठरतील. अनसुचित जातीच्या व्यक्ती ३२ वर्षांची तर ओबीसी व्यक्तीला ३० वर्षांची वयोमर्यादा आहे. इच्छुक सदस्याने शासनमान्य विद्यापीठातून पदवीपर्यंतचं किंवा समतुल्य शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक आहे. तसंच संगणकाचं ज्ञानही आवश्यक आहे.

निवडलेल्या व्यक्तींना वेतन रु. ९,३०० ते ३४,८०० पर्यंत मिळेल. ग्रेड पे ४२०० रुपये असेल. तसंच केंद्र सरकारतर्फे भत्ताही लागू होईल. अपंग व्यक्ती या पदासाठी ग्राह्य मानल्या जाणार नाहीत. यासंदर्भात होणाऱ्या लेखी परीक्षा दोन स्वरुपाच्या असतील. एक बहुपर्यायी प्रश्नावलीच्या स्वरुपातील प्रस्न पत्रिका असेल, तर दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत सविस्तर उत्तरं देणं आवश्यक आहे. सविस्तर उत्तरं केवळ इंग्रजी भाषेतच देणं आवश्यक आहे.

अधिक माहिती www.mha.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, July 25, 2013, 18:46


comments powered by Disqus