Last Updated: Thursday, January 30, 2014, 17:25
www.24taas.com , झी मीडिया , नवी दिल्ली, आंतरराष्ट्रीय सिटी बँक भारतात रोजगार उपलब्ध करून देणार आहे. यावर्षी सिटीग्रुपकडून भारतात २५०० लोकांना हायर केलं जाणार आहे.
सिटी ग्रुपचे एच आर हेड पॉल मॅकनॉन यांनी सांगितल्याप्रमाणे भारत हे सिटीग्रुपच्या गुंतवणुकीचे क्षेत्र आहे. गेल्या वर्षी आम्ही २५०० लोकांना नोकरी दिली.
यंदा आम्ही तितक्याच नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहोत. सिटीग्रुपसाठी भारत एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहे. भारत हा एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त उत्त्पन्न देणारी बाजारपेठ आहे. २५०० रोजगारामध्ये सर्व स्तरावरील संधींचा समावेश होणार आहे.
कंज्यूमर बँकिंग , इनवेस्टमेंट बँकिग , ट्रांझ्याक्शन सर्विसेस आणि ट्रेझरी बिझनेस या स्तरावर रोजगार उपलब्ध होणार आहे.
कंज्यूमर बँकिंग व्यवसायामुळे दोन वर्षे सातत्याने नफा मिळला आहे. क्रेडीट कार्ड, वेल्थ मॅनेजमेंट , होम लोन या क्षेत्रात विकास झाला आहे. कॉलेज कँपस मधून २०० जणांना नोकरी देण्यात येणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 30, 2014, 17:24