Last Updated: Thursday, December 13, 2012, 11:40
www.24taas.com, नवी दिल्ली खगोलशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार १३ डिसेंबर आणि १४ डिसेंबर रोजी खगोलप्रेमींना एक अद्भूत असं दृश्यं पाहायला मिळणार आहे. गुरुवार आणि शुक्रवारी उल्का वर्षाव होणार आहे. त्याचमुळे आकाशात विविधरंगांची उधळण दिसून येणार आहे.
‘सायन्स पॉप्युलरायजेशन असोसिएशन ऑफ कम्युनिकेटर्स अॅन्ड एज्युकेटर्स’चे अध्यक्ष सी. बी. देवगन यांच्या म्हणण्यानुसार, १३ डिसेंबर आणि १४ डिसेंबर रोजी रात्री आकाशात उल्कावर्षावामुळे विविध रंग पसरले जाण्याची शक्यता आहे. जेव्हा उल्कावर्षावाचा महत्त्वाचा क्षण सुरू असतो अशावेळेस एकाचवेळी प्रतितासाला ६० विविध रंगांचा प्रकाश पाहता येतो. या उल्का वर्षावातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा स्रोत धुमकेतू नाही तर एक दगडासारखा दिसणार छोटासा ग्रह आहे. ३,२०० फाइथोन असं या ग्रहाचं नाव आहे.
उल्का वर्षाव पाहण्यासाठी सगळ्यात योग्य वेळ म्हणजे १४ डिसेंबरच्या पहाटे पाच वाजता... पूर्व दिशेला ही रंगांची किमया तुम्ही पाहू शकता. हे दृश्यं पाहण्यासाठी कमीत कमी प्रकाश आणि कमी प्रदूषण असायला हवं. कोणत्याही उपकरणाशिवाय उघड्या डोळ्यांनीही तुम्ही हा उल्का वर्षाव आणि प्रकाशाची उधळण पाहू शकता.
First Published: Thursday, December 13, 2012, 11:40