गोंधळामुळे अखेर परीक्षा झाली रद्द! Exam cancelled due to chaos

गोंधळामुळे अखेर परीक्षा झाली रद्द!

गोंधळामुळे अखेर परीक्षा झाली रद्द!
www.24taas.com, नाशिक

नाशिकमधल्या सॅक्रेड हार्ट शाळेत चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिप पूर्वतयारी परीक्षेच्यावेळी चांगलाच गोंधळ उडाला. हा गोंधळ निस्तरण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली.

मुंबईच्या सावित्रीबाई फुले अकादमीने आयोजित केलेल्या या परीक्षेत आज चार ते पाच हजार मुले आपल्या पालकांसह शाळेत आल्याने नियोजन कोलमडले. यावेळी अवघ्या दोन ते तीन शिक्षकांवर जबाबदारी टाकून शाळेतील सर्व जबाबदार शिक्षक अधिकारी गैरहजर होते. अरुंद इमारतीत मुलांचा गोंधळ, परीक्षा नियंत्रक शिक्षकांच्या अभावी पालकामध्येंच मारामा-या झाल्याने अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आलं.

पोलीस येऊनही परिस्थिती नियंत्रणाखाली येत नव्हती. परीक्षेचा गोंधळ सुरूच होता. त्यामुळे अखेर ही परीक्षा रद्द करण्यात आली.

First Published: Sunday, February 17, 2013, 19:45


comments powered by Disqus