बनावट अकाऊंटवर फेसबुकची नजर facebook watch on fake account

बनावट अकाऊंटवर फेसबुकची नजर

बनावट अकाऊंटवर फेसबुकची नजर

www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई

आगामी लोकसभा निवडणुकीत तरुण मतदार जास्त संख्येनं मतदान करणार आहेत. तसंच तरुण मतदारांना सोशल नेटवर्किंग साइटचं जणू काही व्यसनच लागलं आहे. म्ह्णूनच राजकीय पक्ष सोशल साइटचा वापर प्रचारासाठी करुन तरुण मतदारांचं लक्ष वेधू घेतायंत.

मात्र फेसबुकसारख्या सोशल साइटवर बनावट प्रोफाईल्स बनवून राजकीय पक्षांचे ‘लाइक्स’ आणि ’फॉलोअर्स’ ची संख्या वाढतेय. त्यामुळे फेसबुकने अशा गैरप्रकारावर कारवाई करण्यास चालू केलंय. तसेच बनावट अकाऊंट्स ऑटोमेटेड आणि मॅन्युअल यंत्रणेचा वापर करुन बंद केली जातायंत.

एखादे अकाऊंट बनवणे, रजिस्टर करणे, फ्रेंड्स बनवणे, मॅसेज पाठवणे अशावेळी बनावट अकाऊंट ओळखता येतात. तसेच बनावट अकाऊंट पडताळण्यासाठी फेसबुककडे मशीन यंत्रणा असल्याचे फेसबुक अधिकारांनी म्हटलंय. फेसबुकमुळे राजकीय पक्षही अधिकच सक्रिय झालाय आणि त्यांच्यासाठी फेसबुक खरंच महत्त्वपूर्ण भाग आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 1, 2014, 12:15


comments powered by Disqus