क्रेझी कारप्रेमींसाठी फोर्डची नवी 'इको स्पोर्ट’..., Ford EcoSport in India today

क्रेझी कारप्रेमींसाठी फोर्डची नवी 'इको स्पोर्ट’...

क्रेझी कारप्रेमींसाठी फोर्डची नवी 'इको स्पोर्ट’...
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

दीर्घकाळाच्या प्रतिक्षेनंतर ग्लोबल कार कंपनी फोर्ड आज भारतात एक नवी कॉम्पॅक्ट स्पोर्टस युटिलिटी कार लॉन्च करत आहे. ही कार आहे ‘इको स्पोर्ट’.

फोर्ड इकोस्पोर्टची किंमतही आकर्षक राहिल याची काळजी कंपनीनं घेतलीय. पेट्रोल व्हर्जन कारची सुरुवातीची किंमत ५.५९ लाख रुपये असेल. एक लीटर पेट्रोलसहीत इकोबुस्ट टेक्नोलॉजी, १.५ लीटवर पेट्रोल आणि १.५ लीटर डीझेल इंजिन अशा तीन पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध होईल. एक लीटर पेट्रोलसहीत इकोबुस्ट टेक्नोलॉजीची किंमत ७.९० पासून सुरु होईल. तर १.५ डिझेल इंजिन कार ६.६९ लाखांत उपलब्ध होऊ शकेल.

स्पोर्टसकारप्रेमी या गाडीची मोठ्या आतुरतेनं वाट पाहत आहेत. इकोस्पोर्ट चार वेगवेगळ्या रुपांत उपलब्ध आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन पेट्रोल व्हर्जनमध्ये तीन इंजिनच्या पर्यायासहित मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची सुविधा देण्यात आलीय

नुकतंच, फोर्ड इंडियानं इकोस्पोर्टच्या लॉन्चिंगसाठी तारिख जाहीर करून बुकींगची घोषणा केली होती. भारतीय बाजारात फोर्डच्या काही डिलर्सनं ५०,००० रुपयांसहीत इकोस्पोर्टची प्री-ऑर्डर बुकींग अगोदरच केलीय. इकोस्पोर्ट सर्व चार मीटर कॅटेगिरी एसयूव्ही आहे. फोर्ड फिएस्टाच्या धर्तीवर ही गार्ड बनवण्यात आलीय.

इकोस्पोर्टमध्ये कंपनीनं नवीन एक लीटर इकोबुस्ट पेट्रोल इंजिनचा वापर केलाय. खास सेफ्टीफिचर्सही यामध्ये देण्यात आलेत. छोटे-छोटे स्टोरेज स्पेसमुळे ही कार जास्त मोकळी-ढाकळी दिसतेय. पाच व्यक्ती या कारमध्ये आरामात प्रवास करू शकतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 26, 2013, 12:30


comments powered by Disqus