विद्यार्थ्याला मिळाली ८१ लाखांची नोकरी, IIT Bombay student offered Rs. 81 lakh

विद्यार्थ्याला मिळाली ८१ लाखांची नोकरी

विद्यार्थ्याला मिळाली ८१ लाखांची नोकरी

www.24taas.com, मुंबई
आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्याला एका कंपनीची तब्बल ८१ लाखांच्या नोकरीची ऑफर आली. कॅम्पस इंटरव्ह्यूमधून ही लॉटरी लागली असून, त्याच्यापाठोपाठ आणखी एकाला ५४ लाखांचे पॅकेज मिळाले आहे.

या दोन्ही नोकर्याू परदेशात असून, गेल्या वर्षी सर्वाधिक ऑफर ६३ लाखांची होती. कॅम्पस रिक्रुटमेंटसाठी यंदा सॅमसंग, गुगल व मायक्रोसॉफ्टसह तब्बल १६० कंपन्यांनी हजेरी लावली होती.

यावर्षी कंपन्यांनी १६० विद्यार्थ्यांना ऑफर दिली आहे. गेल्यावर्षी १४० विद्यार्थ्यांना अशा प्रकारे नोकरीची ऑफर देण्यात आली होती.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा १० टक्के वाढ करून पगार देण्यात आला आहे. गेल्यावर्षी एका विद्यार्थ्याला ६३ लाखांचे पॅकेज देण्यात आले होते. यंदा एकूण १३०० विद्यार्थ्यांनी नाव नोंदविले होते.

First Published: Tuesday, December 4, 2012, 14:03


comments powered by Disqus