नोकरी : बँकांमध्ये लिपिक पदासाठी भरती, job in banks : ibps clerk exam 2013

नोकरी : बँकांमध्ये लिपिक पदासाठी भरती

नोकरी : बँकांमध्ये लिपिक पदासाठी भरती
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एकिकडे मार्केट मंदीच्या विळख्यात अडकण्याची परिस्थिती निर्माण झाली असताना दुसरीकडे बँकिंग सेक्टरमध्ये मात्र उमेद्वारांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्यात.

पीओ आणि मॅनेजमेंट सेक्शननंतर आता इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सन सिलेक्शन (आयबीपीएस)मध्ये लिपिक पदासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलंय.

बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये रिक्त पदांसाठी उमेद्वारांना आवाहन करण्यात आलंय. यासाठी होणाऱ्या ‘कॉमन लेखी परीक्षे’साठी रजिस्ट्रेशन सुरू झाले आहेत. रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख ७ सप्टेंबर आहे. यानंतर ऑफलाईन पेमेंटची व्यवस्थाही उपलब्ध आहे. ऑफलाईन पेमेंटची शेवटची तारीख असेल १२ सप्टेंबर. ‘आईबीपीए’च्या या परीक्षेसाठी ऑब्जेक्टीव्ह प्रश्न असतील. लेखी परीक्षेसाठी तर्कशास्त्र, इंग्रजी, अंकगणित, जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर नॉलेज या विषयांचे ४०-४० प्रश्न असतील.

प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असेल. चुकीच्या उत्तरांसाठी मार्क वजा केले जातील. दोन तासांत हा पेपर सोडवायचा आहे.

परीक्षेनंतर कॉल लेटर ऑक्टोबर २०१३ नंतर आयबीपीएस वेबसाईटवर मिळतील. इच्छुक अधिक माहितीसाठी आयबीपीएसची वेबसाईट बघू शकतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, August 23, 2013, 18:52


comments powered by Disqus