Last Updated: Tuesday, June 10, 2014, 13:24
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या मंत्रालयात, प्रशासकीय विभाग आणि बृहनमुंबई महानगरपालिकेच्या विविध कार्यालयातील तब्बल 1300 जागा रिक्त आहेत. लिपिक-टंकलेखक (मराठी व इंग्रजी) पदाच्या या जागा आहेत.
लिपिक टंकलेखक पदसंख्या मराठी : 1190 (मंत्रालयीन प्रशासकीय विभाग 408, बृहन्मुंबई महानगरपालीकेंतर्गत, राज्य शासनाच्या विभागात ७८२ पदे)
तर इंग्रजी : 110 (मंत्रालयीन प्रशासकीय विभाग 40, बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत 70 पदे) रिक्त आहेत.
शैक्षणिक अहर्ता: माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण
तसंच मराठी टंकलेखन ३० श.प्र.मी. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मी.
यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जून 2014 आहे. तर परीक्षा रविवार दि.27 जुलै 2014ला आहे. अधिक माहितीसाठी लॉग इन करा http://www.mpsc.gov.in/ वर
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, June 8, 2014, 15:06