महेंद्राची कमी किंमतीची हटके न्यू बाईक, mahndra company : new bike

महेंद्राची कमी किमतीची हटके न्यू बाईक

महेंद्राची कमी किमतीची हटके न्यू बाईक
www.24taas.com झी मीडिया, मुंबई

बाईक घेणाऱ्यासाठी एक खुशखबर... सेंटुरो या बाईकच्या यशानंतर महेंद्रा आता कमी किंमत असणारी आणखी एक नवीन बाईक मार्केटमध्ये आणत आहे. या नवीन बाईकचे फिचर्सदेखील चांगलेच असतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

महेंद्रा कंपनीने आपल्या टू व्हीलर बाईकचा विस्तार करत असतांना आता पुन्हा एक नवीन बाईक मार्केटमध्ये आणार आहेत. युटिलिटी वाहनांच्यानंतर महेंद्राने टू व्हिलरच्या निर्मितीमध्ये पाऊल टाकले. त्यांनी स्टॅलिओ आणि पैंट्रो या दोन बाईक लॉन्च केल्या पण सेंटुरोमुळे महेंद्रला यश आले. सेंटुरोच्या यशानंतर महेंद्रा पुढचे पाऊल उचलून पुन्हा एक नवीन बाईक मार्केटमध्ये आणण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

नवीन बाईकचे मॉडेल

महेंद्राची नवीन येणारी बाईक ही पैंट्रो बाईकचे नवीन मॉडेल असेल. बाईकची डिझाईन पैंट्रोपेक्षा थोडी वेगळी असेल. महेंद्रा आपल्या नवीन बाईकमध्ये जुने १०६.७ सीसी एमसीआई इंजीनचाच वापर करणार आहे. ही बाईक सेंटुरो सारखेच चांगले फिचर्स घेऊन येणार आहे. सेंटुरो ही शानदार आणि कमी किंमत असल्याने लोकांची आवड बनत आहे. या गोष्टींचा विचार करूनच महेंद्रने ही नवीन बाईक आणली. या नवीन बाईकची किंमत पैंट्रोपेक्षा कमी असेल अशी शक्यता आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, August 17, 2013, 12:10


comments powered by Disqus