आता ग्रंथालयातील पुस्तकं एका क्लिकवर , National Mission on Libraries launched Online website

आता ग्रंथालयातील पुस्तकं एका क्लिकवर

आता ग्रंथालयातील पुस्तकं एका क्लिकवर

www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली ,

वाचनाची आवड असणाऱ्यासाठी संपूर्ण देशातील सार्वजनिक ग्रंथालयांची पुस्तकं आता एका क्लिकवर उपलब्ध असणार आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे एका ऑनलाईन पोर्टलची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये डिजीटल स्वरूपात साहित्याचं जतन करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय ग्रंथालय मिशन (एनएमएल) कडून देशातील ३४ हजार ग्रंथालयांना या योजनेत समाविष्ट करण्यात येईल. या योजनेमुळे देशभरातील सामान्य व्यक्तींसाठी आनलाईन माध्यमातून पुस्तकं डिजीटल स्वरूपात उपलब्ध होतील. या योजनेमुळे आपल्याला हवं ते पुस्तक डाउनलोड करता येणार आहे.

राष्ट्रपती प्रणब मुखर्जी ३ फेब्रुवारीला राष्ट्रपती भवनात या योजनेचा शुभारंभ करतील. सांस्कृतिक मंत्री चंद्रेश कुमारी कटोच यांच्या उपस्थितीत ३ फेब्रुवारीला राष्ट्रपतींच्याहस्ते वेबसाईटचे औपचारिक उद्घाटन होईल.

सांस्कृतिक मंत्रालयाचे संयुक्त सचिव जे. श्रीनिवासन यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१६-१७पर्यंत पूर्णपणे लागू करण्यात येणाऱ्या योजनेमुळे वाचकांच्या संख्येत वाढ होईल.

`नॅशनल मिशन ऑन लायब्ररी इन इंडिया`कडून नॅशनल व्हर्चुअल लायब्ररी ऑफ इंडियाची निर्मिती केली जाणार आहे. कोलकाता येथिल राजा राम मोहन लायब्ररी फांउडेशनला एनएमएल लागू करण्यासाठी प्रमुख संस्था आहे.

ग्रंथालयाचं संगणकीकरण करून त्याना एकमेकांशी जोडण्यात येणार आहे. सांस्कृतिक मंत्रालयाचा ही महत्वाकांक्षी योजना आहे.





इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, February 1, 2014, 14:08


comments powered by Disqus