Last Updated: Friday, August 16, 2013, 17:26
www.24taas.com झी मीडिया, नवी दिल्लीदक्षिण कोरीयास्थित ‘सॅमसंग’ या कंपनीचा नवीन फ्लीप फोन आता बाजारात आलायं. फ्लीप फोन ‘एससीएच-डब्लयू ७८९’ लॉन्च झालायं.
हा फोन सध्या तरी फक्त चीनच्या बाजारात उपलब्ध झाला आहे. मात्र जगातील इतर बाजारपेठेत हा फोन आलेला नाही. सॅमसंग ही प्रसिद्ध कंपनी आहे. या कंपनीने फोनची किंमत गुलदस्त्यात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सॅमसंग ‘डब्लयू ७८९’ या फ्लीप फोनची डबल स्क्रीन असून ३.३ इंचाचा फूल डिसप्ले आहे. ३२०*४८० एवढा पिक्सेल रिझोल्युशन आहे. १.२ गिगाहर्टझ एवढी क्षमता असून क्वाईड-कोर प्रोसेसर आहे. ‘एससीएच-डब्लयू ७८९’ अॅन्ड्रॉईड ४.१ जेली बीन आहे. या फोनचा कॅमेरा हा २.१ मेगापिक्सेल आहे. या फोनमध्ये ‘चॅटऑन’ अॅप्सची सुविधा आहे.
‘एससीएच-डब्लयू ७८९’ चे फिचर्स... • डबल स्क्रीन आणि डबल सीमकार्ड(सीडीएमए + जीएसएम)
• ३.३ इंचचे एचवीजीए डिसप्ले
• अॅन्ड्रॉईड ४.१ जेली बीन
• ३२०*४८० पिक्सल रोझीलेशन
• १.२ गिगाहर्टझ क्वाईड-कोर
• ५ मेगापिक्सल फ्लॉश कॅमेरा
• ब्लूटूथ, वाय-फा, जीपीएस
• १५००mAh बॅटरी
First Published: Friday, August 16, 2013, 16:47