डॉल्फिन’च्या नवीन प्रजातीचा शोध, New species of dolphin discovered!!

डॉल्फिन’च्या नवीन प्रजातीचा शोध

डॉल्फिन’च्या नवीन प्रजातीचा शोध

www.24taas.com, झी मीडिया, मेलबर्न

‘डॉल्फिन’ मासा त्याच्या प्रेमळ, मैत्रीपूर्ण वागणूकीसाठी तसेच हुशारीसाठी प्रसिद्ध आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत ‘डॉल्फिन’ हा सर्वांच्याच आकर्षणाचा आणि उत्सुकतेचा भाग ठरलाय. याच उत्सुकतेची परिणीती म्हणजे, ऑस्ट्रेलियाच्या उत्तरी समुद्र किनाऱ्याजवळ हंपबैक डॉल्फिनच्या एका नवीन प्रजातीचा मासा दिसलाय.

आपल्या मागच्या पंखाच्या बरोबर खाली थोडा वक्र आकार असलेला हा मासा ‘हंपबैक डॉल्फिन’च्या नावानं ओळखला जातो. या माश्याची लांबी आठ फूटांपर्यंत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या माशाचा रंग गडद करडा, सफेद किंवा गुलाबी असतो.

ही प्रजाती सामान्यत: पॅसिफिक ते हिंद महासागरापासून ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर समुद्री जल, डेल्टा आणि ज्वारनदमुखमध्ये आढळली जाते. ‘अमेरिकन म्युझियम ऑफ नॅच्युरल हिस्ट्री’च्या वन्यजीवन संरक्षण सोसायटी संशोधकांनी या सस्तन जलतरण प्राण्याच्या नामशेष प्रजातींचा शोध लावण्यासाठी भौतिक आणि आनुवांशिक आकड्यांचा अभ्यास केला आणि त्याचा इतिहासही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

‘डब्ल्यूसीएस’चे लॅटीन अमेरीका आणि कॅरिबियन कार्यक्रमाचे सहाय्यक अधिकारी आणि या अध्ययनाचे प्रमुख लेखक डॉ. मार्टिंन मॅन्डिज सांगतात, आपल्या संयुक्त, रूपात्मक आणि अनुवांशिक अध्ययनाच्या अनुमानावरून हंपबैक डॉल्फिनच्या कमीत कमी चार प्रजाती असल्याचं आपल्याला समजू शकतं. या हंपबैक डॉल्फिनच्या चार प्रजातींना ओळखण्याचंही मॅन्डीज यांनी म्हटलंय.

हंपबॅक डॉल्फिनच्या चार प्रजातींमध्ये, पश्चिम अफ्रिकेजवळच्या पूर्व अटलांटिक महासागरात आढळणाऱ्या ‘हंपबॅक डॉल्फिन (सोउसा तेउस्जी), मध्य पासून पश्चिम हिंद महासागरापर्यंत आढळणारे ‘इंडो-पॅसिफिक हंपबैक डॉल्फिन’ (सोअसा प्लमबीआ) आणि पूर्व हिंद ते पश्चिम हिंद महासागरात आढळणारे ‘इंडो-पैसिफिक हंपबैक डॉल्फिन’ (सोअसा चिनेन्सिक) यांचा समावेश होता. या तीन प्रजातींमध्ये नुकतीच उत्तरी ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्याजवळ आढलेल्या नवीन प्रजातीचाही समावेश करण्यात आलाय. परंतु, या प्रजातीचं नाव मात्र अजूनही निश्चित करण्यात आलेलं नाही


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, October 31, 2013, 15:29


comments powered by Disqus