Last Updated: Wednesday, December 4, 2013, 20:23
www.24taas.com, वृत्तसंस्था, वॉशिंग्टनअमेरिकेची नासा ही अवकाश संस्था चंद्रावर विविध भाजीपाल्यांच्या बिया पाठविण्याचं नियोजन करत असून, २०१५ मध्ये तिथं भाजीपाल्याचा मळा फुलविण्यासाठी प्रयत्न करत आहे. ब्रिटनमधील एका संकेतस्थळानं याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.
चंद्रावर बिया पाठवून पाणी असलेल्या ठिकाणी भाजीपाल्यांची शेती करण्याचा प्रयोग नासा करणार आहे. नासामधील अनेक वैज्ञानिक यावर संशोधन करत आहेत. पृथ्वीवरून चंद्रावर बिया पाठवून त्याचं रोप तयार करणं. विविध प्रकारच्या बियांवरही याबाबत संशोधन सुरू आहे. चंद्रावरील हवामानाचा शेती पिकासाठी कितपत उपयोग होऊ शकतो याविषयी शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. शास्त्रज्ञांच्या अभ्यासाला नक्कीच यश मिळू शकेल, असं वृत्त देण्यात आलंय.
नासाकडून चंद्रावर एक रोपटं पाठविण्यात येणार आहे. चंद्रावर हे रोपटं जिवंत राहिलं तर पुढील काम सोपं होईल, असं नासामधील प्रवक्त्यां नी सांगितलं. चंद्रावर रोपटं १४ दिवस टिकू शकलं, तर किरणोत्सर्गाद्वारं त्याचं झाडामध्ये रूपांतर होऊ शकेल. पुढं ते ६० दिवस कसं टिकू शकेल, याबाबत संशोधन सुरू आहे, असं वैज्ञानिकांनी सांगितलं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, December 4, 2013, 20:23