मुंबई महापालिकेत ३०० नर्सची होणार भरती, nurse recruitment in Mumbai Municipal Corporation

मुंबई महापालिकेत ३०० नर्सची होणार भरती

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबई महापालिकेत ३०० नर्सची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खातेप्रमुख यांच्या अखत्यारित असलेल्या १६ उपनगरीय रूग्णालयांच्या आस्थापनेवर कंत्राटी परिचारिका या संवर्गातील ३०० पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

या भरतीसाठी वयोमर्यादा १८ ते ३८ वर्ष आहे. वेतन १२,५०० असून भरतीसाठी कस्तुरबा रुग्णालय, साने गुरुजी मार्ग, चिंचपोकळी, मुंबई -४०० ०११ या ठिकाणी महिला उमेदवारांनी दि. ९ जानेवारी २०१४ रोजी सकाळी १०.३० ते १.३० वाजता आणि दुपारी २.३० ते ४.०० वाजेपर्यंत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा
मुंबई महापालिकेत ३०० नर्सची होणार भरती


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, December 27, 2013, 08:16


comments powered by Disqus