Last Updated: Monday, May 26, 2014, 16:02
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीभारतीय स्टेट बँकेत क्लार्क तब्बल 5199 पदांसाठी भरती होणार आहे. 2014-15 साठी ही भरती असेल. देशातल्या एसबीआयच्या अनेक शाखांमध्ये लिपीकाची जागा रिक्त होत असल्यानं नवी भरती करण्यात येतेय. यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 14 जून 2014 ही आहे.
ऑनलाईन फी भरण्याची अंतिम तारीख 14 जून आहे. तर बँकेत जावून फी भरण्यासाठीची अंतिम तारीख 17 जून आहे. एकूण देशभरात 5199 जागा असून महाराष्ट्रात तब्बल 539 जागा आहेत.
अधिक माहितीसाठी पाहा : https://www.sbi.co.in/
First Published: Monday, May 26, 2014, 16:02