सिनेमांची १०० वर्ष, साठेच्या विद्यार्थ्यांचा ‘चित्रशताब्दी स्पर्श’, Sathye College Chitrashatabdhi Festival

सिनेमांची १०० वर्ष, साठेच्या विद्यार्थ्यांचा ‘चित्रशताब्दी स्पर्श’

सिनेमांची १०० वर्ष, साठेच्या विद्यार्थ्यांचा ‘चित्रशताब्दी स्पर्श’
www.24taas.com, मुंबई

सिनेमा आणि तरूणाई याचं नातं काही औरच असतं... ‘अरे अक्षयने रावडी राठोड मध्ये काय फायटिंग केलीय, एक था टायगर मध्ये सल्लू काय दिसतोय, तलाश मध्ये आमिरचा लूक फाडू आहे. करिना काय दिसते यार. आज थिएटरला हा चित्रपट आहे तर आपण जाऊ या का बघायला....’ असा संवाद कॉलेजच्या कट्ट्यावर नेहमीच ऐकायला मिळतो.

या वर्षी चित्रपट सृष्टीला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने ‘चित्रशताब्दी’ ही संकल्पना घेऊन साठे महाविद्यालयातील बीएमएमएमच्या विद्यार्थ्यांनी सिनेमावर आधारित महोत्सव साजरा केला. आणि म्हणता म्हणता अनेक विद्यार्थ्यांनी या माध्यम महोत्सवला हजेरी लावली.

हा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणीच ठरली. चित्रपटाचा इतिहास, पडद्यावरील व मागील कलाकार, तंत्रज्ञ, चित्रपट सृष्टीमध्ये थोर कलावंतांनी दिलेले योगदान ह्या सगळ्याचा आढावा महोत्सवाच्या निमित्ताने घेता आला. तर यात शिक्षकही मागे नव्हते.. ‘गीत गाता चल’ ह्या शिक्षकांच्या अंताक्षरीच्या सोहळ्याने चार चाँद लावले. आणि तरूणाई सोबत तेही काही काळ तरूण होऊन बेधुंद झाले.


सिनेमांची १०० वर्ष, साठेच्या विद्यार्थ्यांचा ‘चित्रशताब्दी स्पर्श’

या फेस्टिवलचे खास आकर्षण तर बॅक प्रोजेक्शन - गंमत पडद्यामागची व वीर चित्रपटातील सलमानच्या कटआऊटची आहे. चित्रपट व चित्रपटांच्या गाण्यांवरती विद्यार्थी व शिक्षकांच्या मतांवर एक माहितीपट तयार केला. चित्रपटाला १०० वर्ष पूर्ण होत असतानाच्या निमित्ताने साठये कॉलेजच्या बीएमएमच्या विद्यार्थ्यांनी माहितीपट तयार करुन सलामी दिली. विशेष म्हणजे साठये महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. माधव राजवाडे आणि प्राचार्या डॉ. कविता रेगे यांनी या महोत्सवाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. अशा या चित्रशताब्दी महोत्सवाला विद्यार्थ्यांचा अनोखा स्पर्श लाभला हे मात्र नक्की.....

First Published: Saturday, December 22, 2012, 18:35


comments powered by Disqus