24taas.com -School Girl`s Suicide

फेसबुक ठरले जीवघेणे

फेसबुक ठरले जीवघेणे

www.24taas.com, जालंधर

जालंधरमध्ये सोशल नेटवर्कींगमुळे विद्यार्थीनीला आपला जीव गमवावा लागला आहे. काही मित्र फेसबुकवर त्रासदायक एसएमएस करीत असल्याने त्रस्त झालेल्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मेहरचंद पॉलिटेक्‍निकमध्ये शिक्षण घेत असलेली आणि जम्मूतील रहिवासी असलेली रक्षा नावाची विद्यार्थिनी हॉस्टेलमध्ये राहत होती. ती महाविद्यालयात कॉम्प्युटर डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्गात शिकत होती. मंगळवारी रात्री महाविद्यालयाच्या वॉचमनने विद्यार्थिनीने पंख्याला गळफास लावलेल्या स्थितीत पाहिल्यानंतर त्याने याबाबतची माहिती व्यवस्थापकांना सांगितली. या विद्यार्थिनीने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे ही माहिती उघड झाली आहे.

मृत्यूपूर्वी मुलीने लिहिलेल्या चिठ्ठीत महाविद्यालयातील नवप्रीत आणि दीपक सोनी हे दोघे जण तिला फेसबुकवर अश्‍लील कमेंट आणि एसएमएस लिहीत होते. त्यामुळे त्रस्त होऊन तिने आत्महत्या केली. या विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published: Wednesday, August 15, 2012, 20:20


comments powered by Disqus