Last Updated: Saturday, March 30, 2013, 22:41
www.24taas.com, मुंबईप्राध्यापकांची कैफीयत शरद पवार केंद्र सरकारकडे मांडणारयत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी आज पवारांची भेट घेतली आणि प्राध्यापकांच्या संपाबाबत त्यांना माहिती दिली.
शरद पवार यांनी हा विषय केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री पल्लम राजू यांच्याकडे मांडण्याचं आश्वासन दिलं. पवार सोमवारी राजू यांना भेटणारयत.
पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगात असलेल्या तफावतीमुळे अडकलेले पंधराशे कोटी लवकर मिळावेत, अशी गळ पवार घालणारयत... पवार यांच्या या शिष्टाईमुळे आता प्राध्यापकांच्या संपावर तोडगा निघण्याची शक्यता बळावलीय.
First Published: Saturday, March 30, 2013, 22:41