Last Updated: Tuesday, August 28, 2012, 14:04
www.24taas.com, लंडनस्पर्म डोनेशनवर आधारित ‘विकी डोनर’ सिनेमाने स्पर्म डोनेशनबद्दल भारतात चांगली जागृती केली. पण इंग्लंडमध्ये मात्र एका स्पर्म डोनरच्या पत्नीमुळे वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. आपल्या पतीचं वीर्य ही आपली वैवाहिक संपत्ती आहे, असं एका स्पर्म डोनरच्या पत्नीचा दावा आहे. एवढंच नव्हे, तर आपल्या आपल्या पतीच्या वीर्याला वैवाहिक संपत्तीचा दर्जा मिळावा यासाठी तिने ‘ह्यूमन फर्टिलायजेशन अॅआब्रयोलॉजी अॅ्थोरिटी’कडेही (एचएफआयए) अर्ज केला आहे.
`डेली मेल` या वृत्तपत्रात देण्यात आलेल्या एका बातमीनुसार पतीने आपल्या पत्नीच्या नकळत स्पर्म डोनेशन केलं होतं. या गोष्टीबद्दल पत्नीला कळताच तिने पतीचं स्पर्म ही आपली वैवाहिक संपत्ती असल्याचा दावा केला. आपल्या पतीच्या वीर्यातून भविष्यात जन्माला येणारी मुलं ही जैवीकदृष्ट्या आपल्या पतीचीच मुलं असतील, त्यामुळे या मुलांचा आपल्याला त्रास होऊ शकतो, असं या महिलेस वाटतं. ही मुलं आपल्या पतीच्या संपत्तीवरही हक्क सांगतील, अशी तिला भीती आहे.
इंग्लंडमध्ये स्पर्म डोनेशन प्रचलित असून एक व्यक्ती केवळ 10 कुटुंबांनाच वीर्यदान करू शकतो. त्यातून जन्माला आलेली मुलं ही मोठी झाल्यावर आपल्या जैविक वडिलांची माहिती मिळवू शकतात. भारतात वीर्यदान कायदेशीर असलं, तरी त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्वी योग्य नव्हता. विकी डोनर या सिनेमामुळे लोकांचा वीर्यदानाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलला असला, तरी भविष्यात भारतात इंग्लंडसारखे प्रश्न उपस्थित व्हायला नको, याची काळजी आत्ताच घ्यायला हवी.
First Published: Tuesday, August 28, 2012, 14:04