Last Updated: Tuesday, May 15, 2012, 10:22
www.24taas.com, नवी दिल्ली नेहमीच दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या दुनियेत नवनवीन मॉडेल्स् दाखल करणाऱ्या बजाज ऑटनं नुकतीच डिस्कव्हर १२५ स्पोर्ट्स टर्नर (एसटी) लॉन्च केलीय. जून महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यत ही बाईक प्रत्यक्षरित्या बाजारात दाखल होईल.
बाईकची नेमकी किंमत मात्र कंपनीनं अजून जाहीर केलेली नाही. बजाजची ‘डीटीएस-आय ट्विन स्पार्क’ टेक्नोलॉजी याही बाईकमध्ये वापरण्यात आली आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे दुचाकीवाहकही सध्या इंधन बचतीचे प्रयत्न करताना दिसतात. माइलेज जास्त हवं असेल तर जुन्या बोरिंग डिझाईन्स आणि जुन्या टेक्नोलॉजीवरच समाधान मानावं लागतं, पण या बाईकमुळे अशा बाईकप्रेमींना दिलासा मिळणार आहे, असा दावा कंपनीनं केलाय.
First Published: Tuesday, May 15, 2012, 10:22