डॉ. कलामांवरही 'फेसबूक'ची मोहिनी - Marathi News 24taas.com

डॉ. कलामांवरही 'फेसबूक'ची मोहिनी

www.24taas.com, नवी दिल्ली 
 
सोशल मीडियाची ताकद सर्वांनाच चक्रावून टाकणारी ठरतेय. अनेकांशी एकाच वेळी संवाद साधण्यासाठी, आपलं म्हणणं मांडण्यासाठी फेसबूक, ट्विटरसारख्या सोशल साईटसचा वापर आता अनेकांना गरजेचा वाटू लागलाय. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनीही याच मार्गाचा वापर केलाय. त्यांनी लोकांशी संवाद साधण्यासाठी चक्क ‘फेसबूक’ची निवड केलीय.
 
देशाच्या विकासाशी संबंधित असलेले विचार सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी आणि विविध क्षेत्राबाबत जनतेशी चर्चा करण्यासाठी त्यांनी फेसबूकवर खातं उघडण्याचं ठरवलं. www.abdulkalam.com हा ई-पेपर आणि यूटूयूबच्या माध्यमातून ते सगळ्यांशी संवाद साधत असतातच पण आता तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या फेसबूकचा वापर करण्याचंही त्यांनी आता ठरवलंय. www.facebook.com/kalambillionbeats मधून ते फेसबूकवर अक्टिव्ह असणार आहेत.
 
'फेसबुक'च्या माध्यमातून डॉ. कलाम अनेक विश्‍वव्यापी घटना लोकांबरोबर 'शेअर' करणार आहेत. देशाच्या विकासास हातभार लावत असलेल्या यशस्वीतांच्या यशोगाथा सर्वांपर्यंत पोचविणे आणि त्यांचे यश साजरे करणे, या दृष्टीने ते अद्वितीय आणि यशस्वी लोकांशी संवाद साधणार आहेत, २०२० चे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामविकास संस्था आणि केंद्रांना भेटी देऊन तरुणांसमोर ध्येय ठेवणार आहेत, अशी माहिती डॉ. कलाम यांचे सल्लागार व्ही. पोनराज यांनी दिली.
 
 

First Published: Wednesday, July 11, 2012, 16:56


comments powered by Disqus