आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे... - Marathi News 24taas.com

आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे...

झी २४ तास वेब टीम, मुंबई 
 
परम जग्गी, विवेक नायर, विकास मोहिंद्रा, कुणाल शहा, मनीत अहुजा, राज कृष्णन, सिद्धांत गुप्ता, निखील अरोरा आणि मनवीर निझर यांची नावं तुम्ही ऐकली असण्याची शक्यता कमीच. पण हे आहेत उदयाचे उगवते तारे. फोर्ब्सने भविष्यात दमदार वाटचाल आणि प्रभावी कामगिरी करतील अशा ३० वर्षाखालील ३६० जणांची यादी संकलीत केली आहे त्यात या भारतीयांचा समावेश आहे.
परम जग्गीचे वय आहे अवघ १७ वर्षे. ऑस्टिन महाविद्यालयात शिकणाऱ्या परमने कारच्या टेलपाईपवर बसवता येणाऱ्या उपकरणाची निर्मिती केली आहे जे कार्बन डायऑक्साईडचे रुपांतर ऑक्सिजन मध्ये करतं.
दमासकस फॉर्च्युनच्या सीईओपदी विराजमान झालेल्या विवेक नायरचे वय आहे २३ वर्षे. औद्योगिक कार्बन उत्सर्जनाचे कार्बन नानोट्युबमध्ये रुपांतर करणाऱ्या तंत्रज्ञानाचा विकास दमासकर ही कंपनी करत आहे
बीओएफए मेरिल लिंचच्या वित्तीय सल्लागारपद भषविणारा २५ वर्षीय विकास मोहिंद्राने तीन वर्षात ३८ दशलक्ष डॉलर्स निधीची उभारणीची किमया साधली आहे. त्यात पाच दशलक्ष रिटायरमेंट सेव्हिंग प्लानचाही समावेश आहे.
गोल्डमन सॅकच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर असलेल्या कुणाल शहाचे वय आहे अवघं २९ वर्षे.
मनीत अहुजाने वयाच्या सतराव्या वर्षी वॉल स्ट्रीटवर आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. आज ती सीएनबीसीची निर्माती असून हेज फंड एक्सपर्ट म्हणुन ओळखली जाते.
बायोलॉजिकल डायनामिक्सच्या सीईओ असणारा २९ वर्षीय राज कृष्णन रक्त तपासणीसाठी इलेक्ट्रिक फिल्डचा वापर करणारी पध्दत विकसीत करत आहे ज्यामुळे कॅन्सर असणाऱ्या रुग्णाच्या रक्तातुन सिग्नल्सद्वाके निदान करता येईल.
वॉशिंगटन विद्यापीठातुन पद्वीधर झालेला २७ वर्षांचा सिद्धांत गुप्ता घरात वीज, वायु संवर्धनासाठी नवं सॉफ्टवेअर आणि सेन्सर विकसीत करत आहे.
निखील अरोराने रिसायक्लड कॉफी ग्राऊंडवर स्वत:च मशरुम लागवड करण्याचा व्यवसाय सुरु केला आहे.
मनवीर अहुजा लंडन स्कुल ऑफ इकोनॉमिक्समधुन शिक्षण पूर्ण केल्यानंतर सिटीग्रुपच्या युरोपियन इक्विटी डेरिवेटिव सेल्सचा सह प्रमुखपदी आहे.

First Published: Wednesday, December 21, 2011, 16:06


comments powered by Disqus