Last Updated: Thursday, February 2, 2012, 13:29
www.24taas.com, मुंबई बजाज पल्सरची नवी स्पोर्टस् बाईक 200NS ही बाजारात आणली आहे. बजाज ऑटोने ही नवी पल्सर 200NS चे मॉडेल तयार करताना मध्यमवर्गीय ग्राहक डोळ्यासमोर ठेवले आहेत. या बजाज पल्सर 200NSची किंमत १ लाखांपेक्षा कमी असणार आहे, अशी माहिती बजाज ऑटोचे प्रबंधक राजीव बजाज यांनी सांगितले.
आकर्षक लूकदेशभरात ६०० डिलर नेमण्यात येणार आहेत. 200NSचे मॉडेल अत्याधुनिक असंच आहे. या बाईकचा लूकही आकर्षक ठेवण्याच आला आहे. तरूणांना ही बाईक नकिच पसंतीला उतरेल, असा विश्वासही राजीव बजाज यांनी यावेळी व्यक्त केला.
या बाईकचे इंजीन अत्याधुनिक आहे. वायु उत्सर्जनासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी प्रथमच इंजीनाच्याखाली सायलेन्सर ठेवण्यात आला आहे, असे बजाज ऑटोचे मुख्य टेक्नॉलॉजीचे अधिकारी युसूफ यांनी स्पष्ट केले आहे.
इंजीन २०० सीसीचेया बाईकचे इंजीन २०० सीसीचे असून यात बाईकची नव्याने रचना करण्यात आली आहे. ट्रीपल स्पार्क, फोर वॉल्ह, सहा गिअर, ० ते ६० अंतर ०.६० सेकंदात कापण्याची क्षमता, १४५ किलोची ही बाईक आहे.
लिक्वीड कुलींग, पेट्रोलसाठी १२ लिटरची टाकी आहे. मोनोक्रॉस सस्पेंशन, ट्युब लेस टायर (ट्युब नाही), सायलेन्सरही इंजीनाच्याखाली ठेवण्यात आला आहे. टॉपस्पीड १४० किमी पर आर आहे. शहरात ३५ तर लाँग रूटला ५८ ऑव्हरेज आहे.
First Published: Thursday, February 2, 2012, 13:29