Last Updated: Monday, November 28, 2011, 07:07
झी २४ तास वेब टीम, विलेपार्ले 
पार्ले महोत्सव लाखो दिलो की धडकन, कारण की वर्षभर या महोत्सवाची पार्लेकर अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत असतात. कारण की हा महोत्सव म्हणजे याचं हक्काचं व्यासपीठ असतं.
पार्ल्यातील कला आणि क्रीडाप्रेमींसाठी हक्काचे व्यासपीठ असलेला एक महत्त्वाचा उत्सव म्हणजे पार्ले महोत्सव. १२ व्या पार्ले महोत्सवाचा दुसरा दिवस चांगलाच गाजला. यावेळी आबालवृद्धांनी एकत्र येवून विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.
तरुणाईनं आपल्या गाण्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध तर केलंच पण या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण ठरला तो होम मिनिस्टर हा कार्यक्रम. रविवारच्या सुट्टीच्या निमित्तानं अनेक गृहिणी या महोत्सवात जमल्या होत्या. भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार हे यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
First Published: Monday, November 28, 2011, 07:07