Last Updated: Friday, February 8, 2013, 08:04
www.24taas.com, मुंबईविलेपार्लेच्या उषा प्रविण गांधी महाविद्यालयाने दोन दिवस आंतराराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन केले आहे. ‘कार्यस्थळातील अध्यात्मिकता’ या विषयावर ह्या परिसंवादाचे आयोजन केलेले आहे. २१फेब्रु आणि २२ फेब्रु २०१३ असे दोन दिवस हा परिसंवाद चालणार आहे. या परिसंवादाला अत्यंत जबरदस्त आणि चांगला असा प्रतिसाद मिळतो आहे. जवळजवळ ६० जणांनी ह्या सहभाग नोंदवला आहे. त्यात अनेकजण परेदशातून सहभागी झाले आहेत.
हा परिसंवाद जागतिक अभ्यासक्रमात एक मैलाचा दगडच ठरणार आहे. या परिसंवादाने मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार हे मात्र निश्चित. श्रीमती जया रोव ह्या या परिसंवादाच्या प्रमुख अतिथी असणार आहेत. तर एका सत्रात एक्सेल इंड्रस्टीचे चेअरमन अश्विन श्रॉफ हे ह्या परिसंवादात मार्गदर्शन करणार आहेत. तर हेल्थ गुरू आणि फेमिना मिस इंडियातील प्रमुख अशा मिकी मेहता ह्या देखील एक संपूर्ण सत्र ह्या परिसंवादात आपलं अनुभव कथन करणार आहेत.
उषा प्रविण गांधी महाविद्यालयाने फक्त अवघ्या नऊ वर्षात एक मानांकित कॉलेज असणाचा मान मिळविला आहे. आणि फार कमी वेळातच त्यांनी हे यश आपल्या पदरात पाडून घेतले आहे. आणि साऱ्याच्या मागे असणाऱ्या या महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. गीता मोहन ह्या आहेत. कडक शिस्तीच्या समजल्या जाणाऱ्या ह्या प्राचार्यांच्या दूरगामी विचारांच्या जोरावर त्यांनी त्यांच्या महाविद्यालयाला वरच्या पंगतीत नेऊन बसविले आहे. या महाविद्यालत इलेक्ट्रॉनिक मीडियाचे शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी प्रयत्नशील असतात. या महाविद्यालयाची खासियत म्हणजे ‘आहान’ हे त्यांच्या कॉलेजचं खास फेस्टीव्हल... पश्चिम उपनगरातील नामांकित कॉलेजमध्ये या फेस्टीव्हलबाबत खूपच उत्सुकता असते.
फेस्टीव्हलची पंढरी मानल्या जाणाऱ्या ‘मल्हार’ ह्या सेंट. झेवियर्स महाविद्यालयाच्या फेस्टीव्हलमध्ये देखील या उषा प्रविण गांधी महाविद्यालयाने आपल्या यशाची पताका फडकावली आहे. तर मुंबई विद्यापीठाच्या फेस्टीव्हल मध्ये पांरपरिक नृत्यात प्रथम पारितोषिक पटकावून ‘हम भी किसीसे कम नही !’ हे दाखवून दिले आहे.
First Published: Thursday, February 7, 2013, 18:10