अमेरिकेतील मुलं वेळेआधीच येताहेत वयात!, Young boys in the U.S. are premature

अमेरिकेतील मुलंही वेळेआधीच येताहेत वयात!

अमेरिकेतील मुलंही वेळेआधीच येताहेत वयात!
www.24taas.com, वॉशिंग्टन

आत्तापर्यंत अमेरिकेतील मुली लवकर मोठ्या झालेल्या तुम्ही ऐकलं असेल पण आता फक्त अमेरिकेतल्या मुलीच नाही तर मुलंदेखील आपल्या सामान्य वयाच्या मानानं एक-दोन वर्ष आधीच वयात येत असल्याचं दिसून येतंय. पण, मुलांमधील हे शारीरिक बदल ओळखायचे कसे हा प्रश्न आता संशोधनकर्त्यांना पडलाय.

नॉर्थ कैरोलिना विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधनकर्त्यांनी हे सर्वांत आधी उजेडात आणलंय. मर्सिया हर्मन-गिडेन्स यांच्या नेतृत्वाखाली केल्या गेल्या अभ्यासात अमेरिकेतील मुलं सहा महिने ते दोन वर्षांच्या अगोदरच यौन अवस्थेत प्रवेश करत असल्याचं लक्षात आलंय.

एका अहवालानुसार, हर्मन-गिडेन्स यांनी पहिल्यांदा १९९७ मध्ये अमेरिकेतील मुली साधारण वेळेच्या अगोदरच वयात येत असल्याचं म्हटलं होतं. पण, हेच संशोधन जेव्हा मुलांच्या बाबतीत करण्यात आलं तेव्हा एखादा मुलगा वयात आलाय की नाही याची ओळख पटवणं खूप कठिण असल्याचंदेखील त्यांनी नमूद केलंय. त्याउलट मुलींच्या शारीरिक बदलांनुसार त्या वयात आल्यात की नाही याची ओळख खूप सोपं असल्याचं त्यांनी म्हटलंय.

हर्मन गिडेन्स यांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही याबाबतीत मुलांशी खुलेपणानं चर्चा करू शकत नाहीत. आणि कित्येक वेळा तर असं करायचा प्रयत्न केला तरी समोरून चांगला प्रतिसाद मिळणं जरा कठिणचं.

First Published: Monday, October 22, 2012, 17:29


comments powered by Disqus