धक्कादायक… ‘मला तुझ्याशी लग्न करायचंय’, Madras High Court, Pre Marital Sex & social sites

डबल मिनिंग… ‘मला तुझ्याशी लग्न करायचंय’

डबल मिनिंग… ‘मला तुझ्याशी लग्न करायचंय’
www.24taas.com, शुभांगी पालवे, झी मीडिया

सज्ञान स्त्री पुरुषांनी परस्परसंमतीने विवाहापूर्वी शरीरसंबध ठेवले तर तो कायदेशीर विवाहच आहे, असं वक्तव्यं मद्रास हायकोर्टाचे वकील सी. एस. कर्नान यांनी एका खटल्याचा निकाल देताना केलं. त्यानंतर सोशल वेबसाईट फेसबुक आणि ट्विटरवर याबद्दल प्रतिक्रिया न उमटल्या तरच नवल... मद्रास हायकोर्टाच्या न्यायाधिशांचं वक्तव्य आणि त्याचा अर्थ जितका धक्कादायक आहे तितक्याच किंबहुना त्यापेक्षा जास्त धक्कादायक या प्रतिक्रिया दिसत आहेत... अशाच काही प्रतिक्रियांवर अगोदर एक नजर टाकुयात...

> एकुणच मद्रास हायकोर्टाला सांगायचंय की, तुम्हाला कुणाशी शारिरीक संबंध प्रस्थापित करायचेत पण लग्न मात्र नाही तर... वयाची २१ वर्ष पूर्ण करण्याच्या अगोदरच करून घ्या

> यापुढे कोर्टानं लग्नाचा पुरावा मागितल्यास, आता तुम्हाला तुमच्या कामाच्या वेळात एक पॉर्न फिल्म कायदेशीररित्या पाहता येईल.

> ‘तुझं लग्न केव्हा झालं?’ ऐवजी ‘तुझ्या कौमार्याचा भंग केव्हा झाला’ असा प्रश्न आता विचारावा लागेल

> ‘देखो मगर प्यार से’ असंच मद्रास हायकोर्टाचं तर्कशास्त्र आहे.

> आता मुलीदेखील आपल्या लग्नाचा पुरावा म्हणून व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करतील.

> आता ‘मला तुझ्याशी लग्न करायचंय’ या वाक्याचा पूर्ण अर्थच बदलून गेलाय.

> इथे अशी अनेक जण आहेत ज्यांनी अनेक वेळा ‘लग्न’केलंय. आता लोक आपल्या लग्नाचा पुरावा कशी काय सादर करणार? आणि ‘कॅज्युअल सेक्स’चं काय?

> मद्रास हायकोर्टाच्या निर्णयानंतर अनेक गोष्टींचा अर्थच बदललाय... याअगोदर तुम्ही एकतर ‘सिंगल’ होता किंवा ‘मॅरिड’ आता तुम्ही ‘व्हर्जिन’ आहात किंवा ‘मॅरिड’.

> माझ्या कॉलेजमधले किती मुलं मुली विवाहित आहेत, याचा मी फक्त विचारच करतोय.

> यापुढे कुणालाही आपल्या लग्नाला बोलवायलाही लाज वाटेल.

> कामसूत्रावर मंगळसूत्र फ्री

> व्हर्जिन की मॅरेज... हाच तुमच्या प्रश्नांचा शेवट असेल

> मद्रास हायकोर्टाच्या निर्णयानुसार, आत्तापर्यंत कितीतरी जणांचा ‘रिलेशनशीप स्टेटस’बदलून जाईल.

> यापुढे मला कुणी पॉर्न फिल्म पाहताना पकडलं तर सांगता येईल, अरे बॉस लग्नाचा व्हिडिओ बघतोय.

> करुणा निधी – मी तीन वेळा लग्न केलंय.... सनी लिओन – हाहाहहा... तु अजून अमॅच्युअर आहेस

> मुलगा – आपण लग्न करुया?... मुलगी – तुझ्या घरी की माझ्या?

> एम्प्लॉई – सर, लग्नासाठी सुट्टी हवीय.... बॉस – अरे, सुट्टीची काय आवश्यकता... लंच टाईममध्ये उरकून ये

> पहिला – तु माझ्या लग्नासाठी का नाही आलास?... दुसरा – एक्सक्युज मी

या प्रतिक्रिया बघितल्यानंतर लग्न, विवाह या नातेसंबंधांबद्दल आजची पिढी काय विचार करते, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. 'लिव्ह इन रिलेशनशीप'ला जोरदार पाठिंबा देणाऱ्या या पिढीचा खरंच नातेसंबंधांवर विश्वास उरलाय का? हा प्रश्न अनेकांना पडतो. पण न्यायालयानं असा निर्णय का दिला असावा, असा साधा प्रश्न या तरुणांना पडत नाही हे तितकंच धक्कादायक आहे. एकमेकांचं 'स्टेटस' शेअर करताना आपण त्याचा विचार करण्याच्या भानगडीत फारसे पडताना दिसत नाही. कदाचित ती गरजही वाटत नसावी. आवडलं म्हणून शेअर केलं, हा फंडा... पण, हा खटला नेमका काय होता आणि का न्यायालयानं असं विधान केलं यावरही एकदा नजर टाकुयात...

मद्रास हायकोर्टाचा निकाल नेमका काय होता
एका पुरुषावर एका महिलेनं खटला दाखल केला होता. १९९४ पासून मुस्लिम कायद्यानुसार आम्ही विवाहित आहोत आणि आम्हाला दोन मुलं देखील आहेत. दोघांनी वेगळं व्हायचं ठरवल्यानंतर (१९९९) पोटगी म्हणून महिलेला आर्थिक मदत करण्यासाठी ‘त्या’नं नकार दिला. यावेळी ही महिला आपली पत्नीच नसल्याचं त्यानं कोर्टासमोर म्हटलं.

या खटल्यात निर्णय देताना मद्रास हायकोर्टानं ‘सज्ञान स्त्री पुरुषांनी परस्परसंमतीने विवाह पूर्व शरीर संबध ठेवले तर तो कायदेशीर विवाहच आहे’ असं आपल्या सुनावणीत म्हटलंय. यावेळी कोर्टानं म्हटलंय की ‘विवाह या विधीमध्ये केले जाणारे सोपस्कार केवळ समाजाला दाखवण्यासाठीच असतात. या खटल्यात सामाजिक गोष्टींपेक्षा कायदेशीर दृष्टीला जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे. लग्नाचा पुरावा नसेल तर या व्यक्तीनं त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मदाखल्यावर बाप म्हणून सहीदेखील केली आहे. यामुळे हे सिद्ध होतंय की त्यानं या महिलेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला होता’

‘इथं याशिवाय या दोघांमध्ये शारीरिक संबंध असल्याचे आणकी काही सबळ पुरावे असते तरीदेखील या दोघांना पती – पत्नीचा दर्जा दिला गेला असता’ असंही कोर्टानं म्हटलंय.

खालच्या कोर्टात ही महिला संबंधित पुरुषाशी विवाहित असल्याचं पुराव्यानिशी सिद्ध करण्यात अपयशी ठरली होती.

खरंच बदललाय का ‘भावने’चा अर्थ

हा निकाल ऐकल्यानंतर, तुम्हाला काय वाटतंय... खरंच बदललाय का नात्यांचा अर्थ?... खरंच बदललाय का ‘भावने’चा अर्थ... आणि बदलला असेल तर तो नेमका कुणी?.... मद्रास हायकोर्टानं... आजच्या तरुणाईच्या विचारांनी की बदलत्या सामाजिक परिस्थितींनी?

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 19, 2013, 11:22


comments powered by Disqus