पासवर्ड श्रीमंतीचा (१ सप्टेंबर २०१२), password shrimanticha (1 September 2012)

पासवर्ड श्रीमंतीचा (१ सप्टेंबर २०१२)

पासवर्ड श्रीमंतीचा (१ सप्टेंबर २०१२)
www.24taas.com, मुंबई


दिनेश पोतदार

शेअर बाजारातील चढ-उतार (२७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट)
सलग चार आठवड्यापासून तेजीत असलेला बाजार, सरत्या आठवड्यात मात्र पुरता कोसळला. प्रॉफीट बुकींग आणि युरो झोन कर्ज चिंतेचा बाजारावर प्रतिकूल परिणाम दिसून आला. आठवड्यातल्या पाच दिवसांपैकी चार दिवस बाजारात मंदी होती. मुंबई शेअरबाजारात सर्वसाधारण ३५३ अंशांची घट दिसून आली. आठवड्याच्या सुरूवातीला २७ ऑगस्टला बाजाराची सुरुवातच निराशाजनक झाली. कच्च्या तेलाची किंमतवाढ आणि त्यामुळे चालू तसंच वित्तीय तूटीबाबत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सोमवारी, बाजार १०४ अंशांनी घसरला. मंगळवारी, २८ ऑगस्टला बाजारातली मंदी कायम राह्यली. सत्ताधारी युपीए आणि विरोधी एनडीएतल्या संघर्षामुळे संसंदेच कामकाज ठप्प झाल्यामुळे आणि घसरलेल्या जागतिक स्टॉक्समुळे मंगळवारी बाजारात ४७ अंशांची घट दिसून आली. बुधवारी, २९ ऑगस्टला बाजारात घसरण कायम होती. रिर्जव्ह बॅकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी अमेरिकेत केलेल्या भाषणात निराशाजनक सूर उमटल्यामुळे बुधवारी बाजार १४० अंशांनी घसरला. गुरूवारी ३० ऑगस्टला, बाजार काहीसा सावरला आणि त्यात ५० अंशाची वाढ दिसून आली. बार्गेन हंटींग म्हणजेच शेअर्सच्या किंमती कमी झाल्यामुळे, त्यांच्या खरेदीत झालेली वाढ आणि परदेशी फंडांनी भारतीय स्टॉक्सची खरेदी सुरु ठेवल्यामुळे गुरूवारी बाजारात सकारात्मक बदल दिसून आला. मात्र, शुक्रवारी ३१ ऑगस्टला बाजार पुन्हा घसरला. जूनच्या तिमाही आकडेवारीत देशाच्या जी़डीपीनं गेल्या तीन वर्षातला नीचांक नोंदवल्याची माहिती समोर आल्यामुळे बाजार शुक्रवारी तब्बल ११२ अंशांनी घसरला.

पासवर्ड श्रीमंतीचा (१ सप्टेंबर २०१२)

विविध सेक्टर्स आणि कंपन्यांची कामगिरी
मुंबई शेअरबाजारातल्या प्रमुख १३ सेक्टर्सपैकी फक्त २ सेक्टर्स तेजीत होते तर ११ सेक्टर्समध्ये मंदी दिसून आली. ऑटो, बॅंका, कन्झ्युमर ड्युरेबल्स, कॅपिटल गुड्स, आयटी, मेटल, आईल एण्ड गॅस, पॉवर, सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या, रियॅलिटी आणि या सेक्टर्समध्ये मंदी होती तर FMCG आणि हेल्थ केअर सेक्टर्स तेजीत होते. पहिल्यांदा नजर टाकू मेटल सेक्टर्सवर..तांबे आणि एल्युमिनियमचा जगातला सर्वात मोठा ग्राहक असलेल्या चीनकडून मागणी कमी झाल्यामुळे, मेटल सेक्टरमध्ये सर्वसाधारण मंदी दिसून आली. स्टर्लाईट आणि हिंडाल्को इंडस्ट्रीज, तसचं टाटा आणि जिंदाल स्टील या प्रमुख मेटल कंपन्यांचे स्टॉक्स घसरले होते. वाहनांच्या विक्रीचा दबाव वाढल्यामुळे ऑटो सेक्टरमध्येही घसरण पहायला मिळाली. टू व्हीलर उत्पादक कंपन्या हिरो मोटो कॉर्प, बजाज ऑटो आणि कार उत्पादक मारूती सुझुकीच्या स्टॉक्स घसरले होते. सर्वात मोठी व्यावसायिक वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्स आणि सर्वाधिक ट्रॅक्टर उत्पादक कंपनी महिंद्रा आणि महिंद्राचे स्टॉक्सही घसरले होते. वळू या बॅंकांच्या स्टॉक्सकडे..ICICI, SBI आणि HDFC या प्रमुख आणि इतर बॅंकांचे स्टॉक्स घसरले होते. आयटी स्टॉक्समध्ये सर्वसाधारण मंदी होती. प्रमुख आयटी कंपनी टीसीएसनं गुरूवारी इंट्रा डे ट्रेडिंगमध्ये नीचांकीची नोंद केली. प्रमुख FMCG कंपनी ITC आणि फार्मा कंपनी सिप्लानं मात्र उच्चांकांची नोंद केली..हेविवेट रिलायन्सच्या स्टॉक्समध्ये घट दिसून आली. सेन्सेक्स पॅकच्या प्रमुख ३० कंपन्यांपैकी २२ कंपन्यांचे स्टॉक्स वधारले होते तर ८ कंपन्यांचे स्टॉक्स घसरले होते. सेन्सेक्स पॅकच्या वधारणा-या कंपन्यांच्या यादीत सिप्ला कंपनी अव्वलस्थानी होती. तर सेन्सेक्स पॅकच्या घसरणा-या कंपन्यांच्या यादीत तांबे उत्पादक कंपनी स्टर्लाईट इंडस्ट्रीज अव्वलस्थानी होती. सेन्सेक्स पॅकपैकी HDFC, टाटा पॉ़वर, विप्रो आणि सन फार्मास्युटीकल्सचे स्टॉक्स वधारले होते. यानंतर समजावून घेऊ या… शेअर बाजाराशी संबंधित महत्त्वाची आणि मूलभूत संकल्पना..


पासवर्ड श्रीमंतीचा (१ सप्टेंबर २०१२)

शेअर बाजाराशी संबंधित मुलभूत आणि महत्त्वाची संकल्पना
दर आठवड्याला शेअर बाजाराशी संबंधित मुलभूत आणि महत्त्वाची संकल्पना आम्ही आपल्याला सांगत असतो. आज आपण- `कंपन्याचे विविध अहवाल म्हणजे काय ? आणि गुंतवणुकीसाठी त्यांचा नेमका कसा फायदा होतो ?` हे समजाऊन घेणार आहोत. कंपनीचे अहवाल हे वार्षिक आणि तिमाही अश्या प्रकारचे असतात. कंपनीच्या कामकाजाचे सर्व तपशील या अहवालात दिलेले असतात. सर्व शेअरधारकांना अहवाल देण्याचे कायदेशीर बंधन कंपनीवर असते. कंपनीची सध्याची कामगिरी आणि भविष्यातली मिळकत आणि लाभांश किंवा डिव्हींडंडचा अंदाज अहवालात नमूद केलेला असतो. मिळकत आणि खर्चावर आधारीत कंपनीचा नफा-तोटा तसच कंपनीची मालमत्ता आणि देण्यांचा ताळेबंदाचाही उल्लेख वार्षिक अहवालात असतो. कंपनीनं चालु वर्षात केलेला व्यवसाय आणि भविष्यातली उद्दीष्टासंबंधीच्या अध्यक्षांच्या निवेदनाचाही अहवालात समावेश असतो. व्यवसाय करण्यासंबंधी कंपनीचं तत्त्वज्ञान, वेगवेगळ्या विभांगाचा कार्यवृत्तांत आणि दिलेली सर्व माहिती खरी असल्यासंबंधीच ऑडिटरच्या प्रमाणपत्राचाही अंतर्भाव अहवालात केलेला असतो. या सर्व बाबींवरून कंपनीची भविष्याताली कामगिरी आणि कंपनीत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल का? यासंबंधीचे आडाखे गुंतवणुकदाराला बांधता येतात. आणि गुंतवणुकीतील जोखीमही टाळता येते. वार्षिक अहवालाशिवाय, छोट्या स्वरूपाचे तिमाही अहवाल आणि इतर आर्थिक अहलाही कंपनी वेळोवेळी प्रकाशित करत असते. शेअरधारकांना सर्व प्रकारचे अहवाल पुरवण्यांचं कपंन्यांवर कायदेशीर बंधन असते, मात्र शेअर धारक नसलेल्या पण गुंतवणुकीची इच्छा असलेल्या इतरांनाही कंपन्यांचे अहवाल कंपन्यांकडून किंवा इंटरनेटवरून उपलब्ध होऊ शकतात.

First Published: Saturday, September 1, 2012, 21:00


comments powered by Disqus