Last Updated: Thursday, April 4, 2013, 18:35
शब्दुली कुलकर्णी www.24taas.com, मुंबई आजकालच्या जगात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. टीव्हीवर तर रिऍलीटी शोज सारखेच चालू असतात. पण मित्रांनो टेड.कॉम विषयी ऐकलं आहे का?...ही एक इंटरेस्टींग साईट आहे. ह्याला तुम्ही खरा रिअॅलिटी शो म्हणाल... ही अशी एक संस्था आहे जी तुम्हाला कल्पना मांडायला एक मंच उभा करून देते... यात जगभरातील भन्नाट कल्पना एका मंचावर मांडली जाते आणि प्रेक्षकांमध्ये असतात एखाद्या देशाचे राष्ट्राध्यक्ष, बिल गेट्स सारखे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती करणारे दिग्गज... त्यांच्या समोर सादर होतात या भन्नाट कल्पना...
टेड.कॉम २००६ साली टेडने जून कोहेन यांच्याद्वारे टेडचा एक टीव्ही शो काढण्याचा प्रयत्न केला. पण तो निर्णय अनेक नेटवर्कने फेटाळून लावला. त्यानंतर टेडने टेड.कॉम ही वेबसाईट त्यांच्या व्हिजीटर्ससाठी काढली. हे व्हिडिओ यू ट्यूब आणि आय ट्यून्सच्या माध्यमातून साऱ्या जगभर प्रसारीत होतात. आरंभी या वेबसाईटवर काही थोडेच व्हिडिओ टाकण्यात आले, परंतु त्याच्या पुढच्या वर्षी त्यात वाढ केली. पाहता पाहता साइटच्या व्हिजीटर्समध्ये लाखो पटीने वाढ झाली. वेबसाईटच्या यशामुळे त्यावर हजारो डॉलर्स खर्च करण्याचा निर्णय वेबसाईटने घेतला.
टेड.कॉम ह्या वेबसाईटने त्याच्या युजरसाठी अनेक पर्याय खुले केले आहेत. त्यामध्ये भाषांतराचा एक पर्याय आहे. कोणत्या युजरला इंग्रजी भाषा समजत नसेन तर त्याला काळजी करण्याची गरज नाही. त्याला हव्या त्या भाषांमध्ये तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता. एका व्हिडिओचे साधारण १३७ भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले आहे, यात आश्चर्य वाटणारी बाब म्हणजे त्यात मराठी, हिंदी आणि गुजराती या भारतीय भाषांमध्येही भाषांतरही करण्यात आले आहे. भाषांतर करून इंग्रजी व्हिडिओला त्या भाषेतून सब-टायटल देण्यात आले आहेत. मराठी भाषांतर करण्यामध्ये सुदर्शन हर्षे, सचिन केतकर, सुभाष पालेकर या आणि इतर ३०-३५ तरूणांचा हात आहे.
अनेक पर्यायांपैकी एक पर्याय म्हणजे युजर त्याच्या मूडनुसार व्हिडिओ बघू शकतात. म्हणजे तुम्हांला एखादा मज्जेदार व्हिडिओ बघणयाचा मूड असेल तर तुम्ही तसे व्हिडिओही बघू शकता. व्हिडिओंची अनेक विभागात विभागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये फनी, इंफॉर्मेटीव्ह, करेजियस, ब्युटीफूल सारख्या विभागांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर तुम्हाला हव्या त्या क्षेत्रामधील व्हिडिओज् तुम्ही बघू शकतात. त्यात मनोरंजन, तंत्रज्ञानासारख्या अनेक क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
यातील काही भारतीय तंत्रज्ञानांच्या विषयी बोलायचे झाले तर प्रणव मिस्त्री या तरुणाने डेव्हलप केलेली सिक्स सेन्स टेक्नोलॉजी. या टेक्नोलॉजीचा वापर केल्यावर आपण कुठेही कोणत्याही सरफेसवर कम्युटर सुरू करू शकतो. तसेच कोणत्याही ठिकाणी लाइव्ह फोटोग्राफी करू शकतो. तसेच मिस्किन इंगावले या एमआयटीच्या विद्यार्थ्याने डेव्हलप केलेली रक्तविरहीत रक्त तपासणी यंत्रणा ही आपल्याला थक्क करून सोडते. रक्ताचा थेंब न घेता व्यक्तीचे हिमोग्लोबिन, रक्तगट, रक्तातील साखऱ या आणि इतर चाचण्या तुम्ही काही सेकंदात करू शकतात. यासाठी केवळ दहा रुपये इतका कमी खर्च येतो. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो.
या वेबसाईटची एक कम्युनिटी असून त्यात त्याचे युजरही सहभाग घेऊ शकतात. त्याबरोबर या वेबसाईटवर जे व्हिडिओ जास्त बघितले जातात त्याची एक यादी वेबसाईटतर्फे देण्यात आली आहे. त्यापैकी कैथरीन कुचहेनबेकर, कोलीन कॅमेरेर, ईलोन मुस्क यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. त्याच बरोबर त्यांनी ब्लॉग सेवाही दिली आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमची प्रतिक्रीया, माहिती कळवू शकता.
टेड संस्थेविषयी थोडंसं! टेडही अशी एक संस्था आहे जी तुमच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी जगभर सम्मेलन भरवते...मुळात त्याचं ब्रीद वाक्यच अस आहे की, ‘आयडीया वर्थ स्प्रेडिंग. टेड या संस्थेची स्थापना १९८४ मध्ये झाली असून त्याच्या वार्षिक संमेनलाची सुरूवात १९९० मध्ये झाली. टेडची पूर्वी वैशिष्ट टेक्नोलॉजी आणि डिझाइन होती. ही संस्था तुम्हांला असा एक मंच उभा करून देते ज्याच्याद्वारे तुम्ही तुमचे विचार किंवा तुम्ही बनवलेले तंत्रज्ञान लोकासमोर मांडू शकतात. या संस्थेने २००६ साली TED.com या वेबसाईटची सुरूवात केली. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या कल्पना, शोध इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना दाखवू शकाल.
टेड-इतिहास टेड या संस्थेची स्थापना रिचर्ड साऊल वुरमन यांनी केली. ते एक आर्कीटेक्चर असून तंत्रज्ञान आणि मनोरंजन माध्यमातील कमतरतेच्या कारणास्तव त्यांनी या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचं पहिल सम्मेलन १९८४ साली वुअरमन आणि हॅन्री मॅक यांनी भरवलं. पहिल्या सम्मेलनात त्यांनी सोनी कॉम्पॅक्ट डिस्क आणि ऍपल मॅकेनटॉशच प्रात्यक्षिक दाखवलं. आरंभी त्यांचे प्रयत्न आर्थिक दृष्ट्या अयशस्वी ठरले. पण १९९० साली या संस्थेने जोर धरला आणि त्यांच्या टेड स्टर्सच्या (चाहत्याच्या) संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली.
आरंभी वक्ते टेड संस्थेच्या परिचित तज्ञांना बोलवत असत, परंतु १९९० पासून शास्त्रज्ञ, विचारवंत, संगीतकार, धार्मिक नेते आणि इतर क्षेत्रातील लोकांचा सहभागही या संस्थेला मिळू लागला.
क्रिस एंडरसन (द सैपलिंग फाऊंडेशन) २००१ साली वुअरमन यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी या संस्थेचे हक्क आपला वारसदार क्रिस एंडरसन यांच्या हाती सोपवले. त्याकाळी न्यू मीडिया संस्थेचे अध्यक्ष असणारे क्रिस एंडरसन यासमवेत विचारविमर्श झाल्यावर त्यांनी या संस्थेच मालकत्व स्वीकारलं. तेव्हापासून आतापर्यंत क्रिस एंडरसन यांची द सैपलिंग फाऊंडेशन ही संस्था टेडचा सारा कारभार सांभाळत आहेत.
२००६ मध्ये या संस्थेचा कारभार ४,४०० डॉलर एवढा होता. त्यानंतर त्याच्या सदस्यत्व फीमध्ये वाढ झाल्यावर त्यांची आर्थिक उलाढाल ६.००० डॉलर्सनी वाढ झाली.
टेड ग्लोबल २००५ साली एंडरसनच्या नेतृत्त्वाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावर टेडने टेड ग्लोबल या नव्या संम्मेलनाची सुरूवात केली. या मंचाद्वारे टेडने या संम्मेलनात विविध देशांना सहभागी होण्यासाठी आवाहन केलं. त्याद्वारे २००५ साली ऑक्सफर्ड, यूके, ट्रांझेनिया आफ्रिका येथे संम्मेलन भरवण्यात आली.
टेड प्राईज टेडने २००५ सालापासून तीन सर्वात उत्कृष्ट कल्पनांना सन्मानित करण्याचे ठरवले, त्यानुसार २०१० सालापर्यंत त्यांनी तीन अत्यंत चांगल्या कल्पनांना १,००,००० डॉलर्सने सन्मानित केले तर २०१० नंतर तीनपैकी एका विचाराला योग्य तो न्याय मिळावा या कारणास्तव एकच कल्पेनेला सन्मानित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
First Published: Thursday, April 4, 2013, 13:13