राज की बात ! - Marathi News 24taas.com

राज की बात !

ऋषी देसाई
www.24taas.com
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हृद्यावरील ऑपरेशनसाठी  केवळ दोन मतप्रवाहच नाही तर सारेच राजकारणीही एक झाले होते..  सा-यांच लक्ष लीलावतीमधून शस्त्रक्रिया यशस्वी होते ही  बातमी कधी येते याकडे लक्ष लागलं होत..
 
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयात एन्जिओप्लास्टी ऑपरेशन पार पडलं. एका पक्ष नेतृत्वावरील अतिशय कठीण आणि नाजूक असलेल्या या ऑपरेशनकडे केवळ ठाकरे कुटुंबाचच नाही तर महाराष्ट्राच लक्ष लागल होत. तीन वर्षापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  यांच्यावर ज्या डॉक्टरांच्या पथकानं यशस्वी अँजिओग्राफी केली होती, त्याच डॉ. सॅम्युअल मॅथ्यु यांच्या पथकान उद्धव यांच्या शस्त्रक्रियेचं आव्हान यशस्वी पेललं..
 
 
 कठीण ऑपरेशन यशस्वी पार पडलं असल तरी शिवसेनाप्रमुखांनी यावेळी सा-या कुटुंबानं हजर राहावं अशी विनंती केली होती.. आणि म्हणूनच लीलावतीत उद्धव यांच्या संपुर्ण कुटूंबासोबतच गेल्या काही वर्षापासून  नात्यातल्या कटूतेमुळे दूरावलेले मनसेप्रमुख आणि उद्धव यांचे बंधू राज ठाकरे स्वतः कुटुंबासह उपस्थित होते..
 
खरंतर  काही दिवसापुर्वीच उद्धव यांच्या छातीत दुखू लागल्यानं  तपासणीसाठी लीलावतीत दाखल करण्यात आले आणि त्याचवेळी त्या बातमीच्या तीव्रता समजताच राज यानी आपला नियोजीत दौरा बाजूला टाकून त्यांनी लीलावती गाठल.. पक्षीय मतभेद बाजूला सारत त्यावेळी राज यानी उद्धव यांची गाठभेठ घेतली.. कारण एकमेंकांच्या विरोधात राजकीय रण पेटवणा-या या दोन्ही भावांमधला रक्ताचा ओलावा कायम होता.. यापेक्षाही महत्वाचं म्हणजे राजकारण्यामध्येही एक माणूस असतो आणि प्रत्येक नेत्यालाही सर्वसामान्यासारखीच नात्याची माणस असतात.. उद्धव यांच्या भेटीत राज यांनी हृद्यविकाराची तिव्रता हेच एकमेव कारण होत.. सारं राजकारण बाजूला सारत त्यावेळी राज यांनी एका भावाची भूमिका पार पडली..
 
 
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही आजघडीला पक्षनेतृत्वाची भुमिका पार पाडतायत.. दोंघानाही स्वतंत्र पक्ष, स्वताची भुमिका, लाखो कार्यकर्ते, पक्ष संघटन, राजकारण , विरोधकांची टिका आणि अवघा महाराष्ट्र यावर जबाबदारीनं लक्ष ठेवावं लागतय.. आणि यासर्वात विशेष म्हणजे विलक्षण झपाट्यानं बदलत गेलेल्या राजकीय परिस्थीतीनं दोंघानाही सा-या परिणांमाना एकट्यांनाच सामोर जाव लागतय.. आज उद्धव ठाकरे हे त्या तमाम राजकीय परिस्थीतीच प्रतिनिधी ठरले आहेत.. राजकारण आणि समाजकारणाची सांगड बांधत २४-२४ तास कार्यकर्ते आणि पक्ष यांच्यासाठी अहोरात्र झटायच.. त्यातच भविष्य़ातल नियोजन आणि विरोधकांची चाल याचे आडाखे बांधत राजकारण कराव लागतय..
 
 
समाज आणि जनता हाच आपला संसार समजत तहानभुख विसरुन प्रत्येक नेत्याला झटाव लागतय.. घराणेशाहीची टिका जरी प्रत्येक नेत्याला सहन करावी लागत असली तरी, याच राजकारणापायी प्रत्येक नेत्यान आज घरादारावर पाणी सोडलय हेही वास्तव आहे.. वेळेवर जेवण नाही, कुटूंबाला वेळ देण नाही या परिस्थीतीत आरोग्याची काळजी घेणे तर कोसो दूरच असत.. आज उद्धव यांच्या निमित्तानं प्रत्येक राजकारण्यांना आणि कार्यकर्त्यांन अंतर्मुख होऊन स्वताच्या आरोग्यस्वास्थ्याबद्दल गांभीर्यानं विचार करण्याची गरज निर्माण झालीय..
 

First Published: Friday, July 20, 2012, 21:51


comments powered by Disqus