ती बोलल्ली, आणि मी उभा हादरलो. एक जुनी सातवी पास बाईने जयराम रमेश याच्या पर्यावरण खात्याची आईभैनचं काढली होती.. ज्याचा मला अभिमान होता त्या कायद्याची लक्तर मांडली होती. आणि माशेवाल्यांचा गाव म्हणणा-या आम्हा कोकणवासियांच्या अस्तित्वावरचं प्रश्नचिन्ह निर्माण केल त्या मायनं. ती फक्त एवढच म्हणाली, या पर्शीयन वाल्यांमुळे सध्या धंदो नाय़ रे, रांडेच्यानी समुद ओऱबाडून न्हेल्यानी हा रे. झिला जमला तर वाचव रे. आमी नाय करुक शकनव. आज आमी उपाशी मरतव येचा दुख नाया. अरे आनी चार वर्सानी यो सगळा
माशा सरतलो रे झिला..
माशे संपणार !
ज्याच्या जीवावर आम्ही लहानाचे मोठे झालो ते मासे संपणार !
कोणाला संपवायचय हे जिवचक्र ?

माझ्यासारख्या पुस्तक वाचुन रडणा-या संवेदनशील किवा सो कॉल्ड जीवाची एकच कालवाकालव झाली.. मी माझ्या दांडीवरच्या, किना-यावरच्या मित्राची भेट घेतली.. आणि हे प्रकरण किती गंभीर आहे य़ाची जाणीव झाली.. या नव्या संकटाचे नाव आहे पर्सीयन जाळ्य़ाच्या नौका.. होय... खरतर पारंपारिक छोट्या नौका ज्याना पात म्हणतात. त्य़ा आणि ट्रॉलर म्हणजे जरा मोठ्या नौका याच्या मार्फत ही पारंपारिक मच्छीमारी चालायची.. या मच्छीमारीला निसर्गनियमाची बंधने आणि समुद्री प्रजोत्पादनाची नव्या बीजाची काळजी असायची.. पण यात आता नव्या पर्सीयन जाळ्याच्या नौकेची भर पडलीय.. पांरपारीक मच्छीमारी ही समुद्राच्या काही खोल भागातच जावून मच्छीमारी करतात..
पण पर्सीयन पद्धतीत थेट समुद्राचा तळ नांगरला जातोय.. यात दया माया काहीच नसते.. आणि याचं स्वरुप एवढं भयानक असते की एकाच वेळी तीन ते चार कंटेनर भरुन मासे मारले जातात.. आणि त्याहूनही वाईट एकाच वेळी तीन चार कंटेनर मासे मारुनही या हैवानाची नजर मरत नाही दुस-या ठिकाणी समजा पापलेट सारखा थवा दिसला तर अगोदर मारलेली मच्छी समुद्रात फेकून पुन्हा नव्याने वेगळ्या माशाचे कंटेनर भरले जातात.. ही हाव आज जीवसृष्टीचे चक्र तो़डतेय..
आज या पर्सीयन प्रकाराने रत्नागिरी, केरळ, तामिळनाडूचं नव्हे तर जपानचीही मच्छी संपवलीय.. आज हा धोका सिंधुदुर्गाला भेडसावतोय.. हे सारं दिसत असूनही फिशरीज आणि कस्टमवाले केवळ मच्छीकरी खावून ढेकर काढत आपण काम का करु शकत नाही याचे कायद्याचे कलम व्यवस्थीत वाचून दाखवतात.. खरतर पांरपारिक मच्छीमाराचा वाद या पर्सिय़न मच्छीमारीला नाही आहे. त्याचं म्हणण रास्त आहे कि, १२ समुद्र मैलाच्या आत येवून ही पर्सीयन मच्छीमारी सुरु असते.. मग मत्स्योबीज होणार कुठे.. आज स्थानिक मच्छीमार उपाशी मरतोय.. दुर्दैवाने या प्रश्नावर कुठलाही राजकीय पक्ष स्वारस्य दाखवत नाही..
सगळं पाहून काळीज तुटतंय, खरच जीव जळतोय.. स्थानिकाना जॉग्राफी कळत नाही पण त्य़ाना भुगोल कळतो.. त्यांना एन्व्ह़ॉर्मेट कळत नाही पण त्याना समुद्रात जीव मरतात ते कळतं..त्याना आपणही माशे मरतो पण आपल्यापेक्षा कोणीतरी ही पैदास संपवतोय याचे दुख होतो.. त्याना जयराम रमेश कोण आहे ठावूक नाही पण उपाशी पोटी आपला श्रीराम-जयराम होणार नक्की ठावूक आहे.. मला ठावूक नाही, हे कोणी संपवणार आहे का.. पण जर कोणी संपवणार असेल तर त्यामागे मी मात्र नक्की असेन.... आणि समुद्रात जावून पुन्हा तीन वेळा आंघोळ करेन, त्या नेत्यांच्या नावानं..