प्रज्ञा मुंडेंमुळे घराण्यात वाद- पंडित अण्णा - Marathi News 24taas.com

प्रज्ञा मुंडेंमुळे घराण्यात वाद- पंडित अण्णा

www.24taas.com , बीड
मुंडे घराण्यातील राजकीय भांडण आता वैयक्तिक पातळीवर आलं आहे. मुंडे घराण्यातील वादाला गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा मुंडे जबाबदार असल्याचा आरोप पंडित अण्णांनी झी २४ तासशी बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे.
 
गोपीनाथ मुंडे यांना मी राजकारणात आणल असल्याचे सांगून येत्या १९ जानेवारी रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
 
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडेवर राजकीय संकट ओढवली आहे. पुतणेशाहीचे बंड शमत नाही तोच आता भाऊबंदकीने डोकं वर काढलं आहे.
 
पुतणे धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु असताना, गोपीनाथ मुंडेंचे बंधु पंडीत अण्णा हे थेट राष्ट्रवादीमध्ये लवाजम्यासह दाखल झाले आहेत. पंडित अण्णाच्या या राष्ट्रवादी प्रवेशाने बीडमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या गडाला खिंडार पडलं आहे. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य पंडित अण्णा मुंडे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंडितअण्णांसोबत भाजपचे १० नगरसेवक आणि ७ ते ८ जिल्हा परिषद सदस्यही राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. जिल्हापरिषद निवडणुंकाच्या पार्श्वभुमीवर विरोधकांबरोबरच आता स्वकीयांचा सामना करण्याचा आव्हान गोपीनाथ मुंडेसमोर निर्माण झालं आहे.
 
 

First Published: Monday, January 16, 2012, 18:04


comments powered by Disqus