Last Updated: Friday, February 3, 2012, 22:37
www.24taas.com, सांगली सांगली जिल्ह्यातल्या येळावी गटातून दोन सख्या जावा एकमेकींच्या विरोधात उभ्या आहेत. ज्येष्ट नेते विश्वास पाटील यांची मोठी सून तेजस्विनी पाटील या काँग्रेसकडून रिंगणात आहेत. तर त्यांची लहान सून स्नेहल पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीत उतरल्या आहेत.
घरात भांडण लावण्यासाठी राष्ट्रवादीनं लहान जाऊबाईंना उमेदवारी दिल्याचा आरोप मोठा जाऊबाईंनी केला आहे. तर आमचं घर हे सुरूवातीपासूनच राष्ट्रवादीचं असल्यानं उमेदवारी मिळाल्याचा दावा लहान जाऊबाईंनी केला आहे. येळावी गट हा गृहमंत्री आर आर पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघात येतो.
First Published: Friday, February 3, 2012, 22:37