मुंडे वाद टोकाला, गाड्यांवर दगडफेक - Marathi News 24taas.com

मुंडे वाद टोकाला, गाड्यांवर दगडफेक

www.24taas.com, बीड
 
बीडमध्ये गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे या काका पुतण्यातला वाद शिगेला पोहोचला आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक उद्या होत असताना वर्चस्वासाठी दोन्ही मुंडेमध्ये संघर्ष पेटला आहे. गोपीनाथ मुंडे यांचे बंधू पंडितराव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं गोपीनाथ मुंडेंपुढं आव्हान उभं राहलं आहे.
 
त्यातूनच घराण्यात हा वाद सुरु झाला आहे. पण आता हा वाद इतक्या शिगेला गेला आहे की  गोपीनाथ मुंडे यांची मुलगी पंकजा मुंडे यांच्या ताफ्यातल्या गाडीवर दगडफेक झाल्यावर आज त्याला प्रत्युत्तर म्हणून धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांच्या ताफ्यावरही दगडफेक करण्यात आली. त्यातुन आता तणावाचं वातावरण निर्माण झाल आहे.
 
बीड पोलीस स्टेशन समोर मोठ्या प्रमाणात जमाव होता. बीडची बाजारपेठही बंद करण्यात आली. ऐन निवडणुकीच्या आदल्या दिवशी अशी घटना घडल्याने आता याचा मतदारांवर नक्की काय परिणाम होणार? मतदार बीड मधून कोणाला हद्दपार करणार आणि कोणाला सत्तेवर बसवणार?
 
 

First Published: Monday, February 6, 2012, 22:26


comments powered by Disqus