कर्नाटक पोलिसांची गरज काय - राणे - Marathi News 24taas.com

कर्नाटक पोलिसांची गरज काय - राणे

www.24taas.com, सिंधुदुर्ग
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदानावेळी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी, कर्नाटकातून पोलीस कुमक मागवण्यात आली आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी यावर आक्षेप घेतला आहे. सिंधुदुर्ग शांत असताना, कर्नाटक पोलिसांची गरज काय, असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे.
 
नारायण राणे आणि भास्कर जाधव ह्या दोघातील वाद गेल्या काही महिन्यापूर्वी अगदीच टोकाला गेल्याने सिधुंदुर्ग आणि मालवण मध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड हाणामाऱ्या झाल्या होत्या. त्यामुळे ऐन मतदानाच्या दिवशी काही गडबड गोंधळ होऊ नये यासाठी कर्नाटक पोलिसांची मदत घेण्यात आली आहे.
 
राणे विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष गेल्या काही दिवसांपासून तळकोकणात उफाळल्यामुळं, या निवडणुकीतही सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा चर्चेत आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८० मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. तसचं कर्नाटक राज्य राखीव दलाची तुकडी मागवल्यानं जिल्ह्यातलं वातावरण पुन्हा तापलं आहे. सरकार हा खर्च का करतं आहे, आणि कोणाच्या सांगण्यावरुन करतं आहे, असा सवाल करत, राणेंनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
 
 

First Published: Monday, February 6, 2012, 22:47


comments powered by Disqus