Last Updated: Tuesday, February 7, 2012, 13:15
www.24taas.com, गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे काँग्रेस उमेदवार बंडोपंत मल्लेवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मल्लेवारांच्या कार्यालयातून एक लाख रुपयांची रोकड आणि दारुचा साठा जप्त करण्यात आला.
मल्लेवारांवर मतदारांना पैसे आणि दारु वाटल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर बंडोपंत मल्लेवार फरार झाले आहेत.
First Published: Tuesday, February 7, 2012, 13:15