Last Updated: Monday, February 20, 2012, 19:08
झी 24 ताससाठी बुलडाण्याहून संतोष लोखंडेमूळचा बुलडाण्यातील असलेल्या नासातल्या एका शास्त्रज्ञाने अमेरिकेतून आपल्या गावी परतून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि जिंकलीही.... ग्रामविकासासाठी झपाटलेल्या शास्त्रज्ञाची काहणी फार रोचक आहे.
बाळासाहेब दराडे....बुलडाणा जिल्हा परिषदेचा नवनिर्वाचित सदस्य....नासामधल्या या शास्त्रज्ञानं आपलं उज्ज्वल भविष्य सोडून निव्वळ समाजाच्या विकासासाठी राजकारणात उडी घेतली...नासामध्ये गलेलठ्ठ पगाराची नौकरी...अमेरिकेतील सुखवस्तू जीवन...शास्त्रज्ञ बाळासाहेब दराडेंबाबतची ही वस्तुस्थिती... तरीदेखील मायदेश आणि मायदेशातल्या ग्रामीण भागाविषयी वाटणारी कळकळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
शेवटी त्यांनी नासातली नौकरी सोडून बुलडाण्यात आपल्या गावी परतले. आणि ग्रामीण भागाच्या विकासाचं कामाला सुरुवात केली. मात्र, काम करण्यासाठी अधिकार लागतात या जाणीवेतूनच त्यांनी बुलडाण्यातल्या पांग्रा डोळेमधील जिल्हा परिषदेची अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यात बाळासाहेब दराडेंनी शिवसेनेच्या शंकर डोळेंचा पराभव केला.
बाळासाहेब दराडे भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशी चर्चा होती. मात्र, आपण कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
मतदारराजा केवळ आमिषालाच भुलतो असं नव्हे तर, मतदार चांगल्या लोकांनाही निवडणुकीत संधीही देतो हेच दराडेंच्या विजयानं सिद्ध झालंय.
First Published: Monday, February 20, 2012, 19:08