बॉलिवूडमधील ‘दबंग’ म्हणजेच अर्थातच सलमान खान जिकडे जातो, त्या ठिकाणी त्याचे चाहते पहिलेच हजर असतात. मित्रांसाठी तो ‘राधेमोहन’ आहे. तर तो त्याच्या चाहत्यांसाठी ‘टाइगर’ पेक्षा कमी नाही. सलमान खान हा ४८ वर्षाचा झाला आहे. सलमान हा त्याच्या चाहत्यांसाठी ‘रजनीकांत’ सारखा आहे कारण त्यांचे चित्रपट हिट किंवा फ्लॉप झाल्यावर ही फॅन्सवर त्यांचा कोणताही परिणाम होत नाही.
जाणून घ्या सलमान खानच्या ४८ वयातल्या खास ४८ गोष्टी ज्यामुळे सलमान बॉलिवूडमध्ये सर्वांपेक्षा वेगळा ओळखला जातो आणि बॉलिवूडमधील ‘दबंग’ म्हणून ओळखला जातो.
१) सलमान खानचा जन्म २७ डिसेंबर १९६५ साली इंदूर या शहरात झाला. त्याचे वडील ‘सलीम खान’ प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांनी १९७५ साली आलेला प्रसिद्ध सुपर हीट ‘शोले’ या चित्रपटाचे लेखन यांनी केले आहे.
२) सलमानने त्यांच्या करिअरची सुरुवात १९८८ मध्ये आलेला `बीवी हो तो ऐसी` या चित्रपटापासून केली. या चित्रपटात सलमानने ‘विकी’ नावाच्या बिघडलेल्या तरुणाची भूमिका केली होती. तसेच तो या चित्रपटात मनाने हळवा आणि खरं बोलणारा असतो.
३) सलमान हा सर्व भावंडांमध्ये सर्वात मोठा आहे. अरबाज खान हा दोन वर्षांनी तर सोहेल हा पाच वर्षांनी सलमानपेक्षा लहान आहे. तसेच सलमानला दोन लहान बहिणी आहे. त्यांची नाव अलविरा आणि अर्पिता आहे.
४) सलमानला कधीच हिरो बनण्याची इच्छा नव्हती. त्याला त्याच्या वडीलांप्रमाणे स्क्रिप्ट राइटर बनायची आवड होती.
५) १९९०मध्ये प्रदर्शीत झालेला ‘बागी’ या हिट चित्रपटाचे लेखन हे सलमानने केले होते. त्यातून सलमानने स्क्रिप्ट राइटंगला संधी दिली होती.
६) १९८९ साली प्रदर्शीत झालेला `मैंने प्यार किया` या चित्रपटात सलमानने पहिल्यांदा महत्त्वाची भूमिका निभावली होती. तसेच हा चित्रपट सुपर हिट ठरला. हा पहिला चित्रपट इंग्रजी आणि स्पॅनिश भाषेत डब करुन तयार करण्यात आला. त्याचबरोबर हा चित्रपट ‘फोर ट्रेक सराउंड साउंड’मधील पहिला हिंदी चित्रपट होता.
७) सलमान खानची लहान बहिन अलविराचं लग्न अभिनेता आणि निर्माता अतुल अग्निहोत्री याच्याबरोबर झालं. त्याने `बॉडीगार्ड` चित्रपट बनवला होता.
८) सलमान हा अजूनही अविवाहीत आहे. मात्र त्याचे अनेक अभिनेत्रीशी प्रेम संबंध जुळले होते. सलमानची पहिली गलफ्रेंड सोमी अली ही पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
९) सलमानच्या प्रेम प्रकरणात गर्लफ्रेंडच्या लिस्टमध्ये सोमा अलीनंतर संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय आणि कटरीना कैफचंही नाव आहे.
१०) सलमान खानच लग्न हा संपूर्ण जगासाठी एक चर्चेचा विषय आहे. तसेच संगीता बिजलानीबरोबर सलमानच्या लग्नाचे कार्डदेखील छापण्यात आले होते. मात्र काही कारणांमुळे संगीता आणि सलमानचा लग्न झालं नाही.
११) १९९७ सालामध्ये एका परदेशी मॅगझीनमध्ये सलमान खान `टफ बॉडी अँड सॉफ्ट फेस` या वर्गामध्ये जगातील सर्वात सुंदर तरुणांच्या यादीत चौथ्या स्थानावर होता.
१२) बॉलिवूडमध्ये सलमान खानच्या मित्रांची लिस्टही खूप मोठी आहे. मात्र त्याच्या खास मित्र संजय दत्त, सुनील शेट्टी, निर्माता साजिद नाडियावाला आणि जॅकी श्रॉफ हे प्रमुख आहेत.
१३) सलमान एवढा मोठा सुपरस्टार असूनदेखील आजही सलमान हा एक मॉडरेट वन बेडरूम फ्लॅटमध्ये राहतो. सलमानने सांगितले की, वांन्द्रे येथे गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये अधिक काळापासून राहतो आहे की कारण सलमानचा पूर्ण परिवार हा याच बिल्डिंगमध्ये राहतो.
१४) सलमान खानचं अपार्टमेंट हे पहिलं दोनच बेडरुमचं होतं. त्यामध्ये बाजूच्या रुममधील भिंत तोडून बेडरुममध्ये मिळवण्यात आली आहे. दुसऱ्या रुममध्ये सलमानची जिम आहे.
१५) ज्यावेळी सलमान मुंबईतील घरात असतो तेव्हा तो नेहमी रस्त्यांवर बाईक चालवण्यासाठी निघून जातो. सलमानला कॉफी पिणे हे खास करून आवडते.
१६) सलमान हा फक्त चांगला बॉडी बिल्डर नसून तो एक चांगला ट्रेनरदेखील आहे. हृतिक रोशन, जायद खान, संजय दत्त, अर्जुन कपूर यांसारख्या अनेक सुपरस्टारांना फिजिकली ट्रेनिंग सलमाननं दिलीय.
१७) अभिनेता हृतिक रोशनला अॅक्टर बनण्याची आवड चित्रपट `करन-अर्जुन`मध्ये सलमानला बघूनच झाली. या चित्रपटावेळी हृतिक त्याच्या वडिलांना राकेश रोशन यांना असिस्ट करत होता.
१८) सलमान हा दरियादिलीसाठी देखील ओळखला जातो. सलमानच्या ‘स्पॉट बॉय’च्या हातात महागडे रॉलेक्सचे घड्याळ घातलेले दिसते. जे सलमाननेच एकेकाळी त्याला गिफ्ट केले होते.
१९) संगीतकार आणि अभिनेता हिमेश रेशमियाला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचं श्रेयदेखील सलमान खानला जातं.
२०) संगीतकार साजिद - वाजिद हेदेखील बॉलिवूडमध्ये आपल्या यशाचे श्रेय सलमानलाच देतात.
२१) सलमान खानने महाराष्ट्रातील पनवेलमध्ये १५० एकर भागात एक फार्म हाऊस बनवला आहे. या फार्म हाऊसचं नाव सलमानची छोटी बहिणीच्या नावावरुन म्हणजेच `अर्पिता फार्म` ठेवले आहे.
२२) बॉलिवूडमधील कोट्यावधी मनानवर राज्य करणाऱ्या सलमान खान हा स्वत: हिंदी चित्रपट सृष्टीतील देवानंद, धर्मेंद्र, मिथुन चक्रवर्ती आणि सनी देओल यांचा चाहता आहे.
२३) सलमान हा हिंदी सिनेमा सृष्टीला ‘बॉलिवूड’ बोलणाऱ्यांच्या विरोधात होता. त्यावेळी सलमानचं म्हणणं होतं की, बॉलिवूड हे नाव हॉलिवूडच्या धरतीवर तयार करण्यात आलं आहे. म्हणून सलमान खानने सांगितले की, बॉलिवूड न बोलता `हिंदी फिल्म इंडस्ट्री` बोलणं जास्त योग्य आहे, असं त्याचं म्हणणं होतं.
२४) सलमान खानच ब्रेसलेट हे आज सलमानचा ओळख बनली आहे. सर्वात पहिले हे ब्रेसलेट सलमानचे वडील सलीम खान वापरत होते. ते त्यांना सलमानच्या काकाने घेऊन दिले होते. या ब्रेसलेटमध्ये फिरोजा हिरा घालण्यात आला आहे. हा हिरा चौथा खलिफा हजरत अली आणि आठवे इमाम रजा फिरोजच्या अंगठीतही बघण्यास मिळत होता.
२५) सलमान खानच ब्रेसलेट बघून तशाच प्रकारचं ब्रेसलेट गोविंदा, सुनील शेट्टी, मनोज वाजपेयी आणि शेखर सुमन यांच्याबरोबर अनेक एक्टर्सनी बनवलं होते.
२६) एकदा सलमान खानचे वडील सलीम खान यांनी सांगितले की, मी सलमानच्या दानशूरपणामुळे खूप त्रस्त झालो आहे. त्यावेळी त्यांनी म्हटले की, सलमान हा वर्षभरात ३ कोटी पेक्षाही जास्त पैसे किंवा तेवढ्या रक्कमेच्या वस्तू दान करतो.
२७) सलमानला बाईक चालवायला फार आवडते. ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटाच्या यशानंतर सलमानने एक डर्ट बाईक विकत घेतली होती. ही बाईक सलमानला सर्वांत जास्त आवडायची. मात्र काही दिवसानंतर सलमान परदेशी शूटिंग करण्यासाठी गेल्यानंतर त्याच्या वडीलांनी ती बाईक विकून टाकली. कारण की, सलीम खान हे सलमानच्या फास्ट बाईकमुळे त्रस्त होते.
२८) सलमान खानला गाणी गाण्याचीदेखील खूप आवड आहे. ‘हॅलो ब्रदर’ या चित्रपटातील `चांदी की डाल पर` हे गाणं स्वत: सलमाने गायले आहे.
२९) ‘गर्व’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमान शूटिंगला नेहमी सायकलवरुन जात असे.
३०) ‘गर्व’ या चित्रपटाचे निर्माते पुनीत तिस्सर यांना कमी पैशामुळे ही चित्रपट लवकर संपवायचा होता. त्यामुळे सलमानला रोज शूटिंग करावी लागत असे. म्हणून सलमानला जिमला जाण्यासाठी वेळ मिळत नसे. त्यामुळे सलमानने सायकल चालवण्याचा निर्णय घेतला होता.
३१) सलमान खानला सिंगिग आणि स्क्रिप्ट राइटिंगबरोबरच पेंटिंगचीही आवड आहे. सलमानने अनेक सुंदर पेंटिंग बनवली आहेत. मात्र, सलमान हा या पेंटिंग विकत नाही. सलमान या पेंटिंग आपल्या खास मित्रांना गिफ्ट करतो. सध्या ‘जय हो’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये ही सलमानच्या पेंटिंगची झलक यामध्ये दिसून येते.
३२) प्रिती झिंटाने तिच्या `इश्क इन पॅरिस` या चित्रपटात सलमानला एक आइटम नंबर साँग ठेवण्याचा विचार केला होता. तसेच त्यावेळी सलमानने तिला होकारदेखील दिला होता. मात्र सलमान हा चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे प्रितीने त्याला आइटम नंबर साँगबद्दल सांगितले नाही. परंतु सलमान चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतानादेखील त्याने प्रितीला आइटम नंबर साँगची आठवण करुन दिली.
३३) सलमानने आतापर्यंत लग्न न करण्याचे कारण सांगत म्हणाला की, माझ्यावरील सर्व गुन्हे जोपर्यंत संपत नाही तो पर्यंत मी लग्न करणार नाही.
३४) करण जौहरच्या रिअलिटी शो `कॉफी विथ करण`मध्ये सलमानने सांगितले होते की, मला माझ्या रुममध्ये एकटे झोपायला आवडते.
३५) सलमान क्रिकेटचा चाहता आहे. `आयपीएल`च्या धर्तीवर सलमानने काही वर्षापूर्वी ‘सीसीएल’ क्रिकेटची सुरुवात केली. सेलिब्रिटी क्रिकेटमध्ये हिंदी चित्रपट सृष्टीबरोबरच दक्षिण भारतीय चित्रपटातील अभिनेत्यांचाही सहभाग असतो. तसेच ते आपल्या आपल्या टीमसाठी खेळत असतात.
३६) सलमानला लहान मुलं जास्त आवडतात. एकदा परदेशात शूटिंग दरम्यान सलमान खान लंचमध्ये पिझ्झा खात असताना बाजूला असलेल्या लहान मुलाने विचारले की, तुम्ही एकटेच पिझ्झा खातात आहे का? त्यावेळी सलमानने त्या मुलासाठी आणि त्याच्याबरोबर असलेल्या त्याच्या सर्व मित्रांसाठी पिझ्झा ऑर्डर केला.
३७) सलमान खानला त्याच्या आईने बनवलेले जेवण फार आवडते. ज्यावेळी मुंबईत शूटिंग चालू असते त्यावेळी सलमान लंचमध्ये आईने तयार केलेलं जेवण खाणे पसंत करतो.
३८) सलमान खानच्या आईची प्रतिमा मदाम तुसा म्युझियममध्ये लावण्यात आली आहे. मात्र, ज्यावेळी ही प्रतिमा तयार करण्यात येत होती तेव्हा सलमानने विरोध दर्शवला होता.
३९) आज दिवसेंदिवस चित्रपटाचे तिकीट दर वाढवण्यात येत आहे. परंतु सलमान हा पहिला बॉलिवूड अभिनेता आहे. जो आपल्याच चित्रपट `एक था टाइगर`च्या रिलीझच्या वेळी मल्टिप्लेक्समध्ये तिकीटाच्या दरवाढीचा विरोध केला होता.
४०) सलमान खानने `एक था टायगर` या चित्रपटाच्या वेळी आपल्या चाहत्यांना सांगितले होते की, कोणीही मल्टिप्लेक्स चित्रपट बघू नये. त्यांनी तिकीटाचे दर वाढवले आहे.
४१) लोकांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवणाऱ्या सलमान खानने जानेवारी २०१२ मध्ये ४० लाख रुपये भरून यूपीमध्ये ४०० अशा आरोपीना जेलमधून सोडवले, जे शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही केवळ रक्कम न भरल्यामुळे जेलमध्ये बंद होते.
४२) सलमान आपल्या `बिइंग ह्यूमन` या संस्थेमार्फत अत्यंत गरीब आणि लहान मुलांना मदत करतो.
४३) काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये सलमानने मोफत `हॅल्थ कॅम्प`चं आयोजन केलं होतं. त्यामध्ये मुंबईमधील प्रसिद्ध डॉक्टरांना बोलवण्यात आले होते.
४४) `बिइंग ह्यूमन`च्या नावाने सलमानने कपडे आणि अनेक वेगवेगळ्या वस्तू लॉन्च केल्या आहे. या वस्तूच्या प्रत्येक खरेदीतून मिळणारे पैसे हे संस्थेच्या माध्यमातून लोकांच्या मदतीसाठी वापरण्यात येतात.
४५) `बिइंग ह्यूमन` प्रॉडक्शनच्यावतीने सलमान खानने २०११ मध्ये लहान मुलांवर आधारित `चिल्लर पार्टी` नावाचा चित्रपट बनवला होता.
४६) `कॉमेडी नाइट्स विथ कपिल` या रिअॅलिटी शोचा सेट एका दुर्घटनेत जळाल्यानंतर सलमानने या कार्यक्रमाचा होस्ट कपिल शर्मा याला शूटींगसाठी ‘बिग बॉस’चा सेट उपलब्ध करून दिला होता.
४७) आतापर्यंत बॉक्स ऑफिसच्या १०० कोटी क्लबमध्ये सलमान खानचेच जास्तीत जास्त म्हणजे पाच चित्रपटांचा समावेश झालाय.
४८) मोठ्या पडद्याबरोबरच सलमान खान हा छोट्या पडद्यावर ही सर्वात महागडा स्टार ठरलाय. बिग बॉसच्या प्रत्येक एपिसोडसाठी सलमाननं पाच कोटी रुपये मानधन घेतलंय.