कमल हासन
दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील एक अनमोल कलाकार असलेला कमल हासन हा भारतीय सिनेमाला आपल्या दर सिनेमागणिक १० पावलं पुढे नेत असतो. त्याने दिलेले एकहून एक हटके आणि अभिनयाची उंची गाठणारे परफॉर्मंसेस पाहून भलेभले अवाक होतात. कुठल्याही एक साच्यात अडकून न पडता कमल हासनने आत्तापर्यंत अभिनयात जी विविधता जोपासली आहे, तिला आंतरराष्ट्रीय स्तरावरही गौरवलं गेलं आहे. वैविध्यपूर्ण, काळाच्या पुढचे, तांत्रिकदृष्ट्या अद्भूत आणि आपल्या चेहऱ्यावर आणि अभिनयात प्रयोग करणारा हा अभिनयसम्राट कमल हासन...
एक दुजे के लिये
के बालचंदर यांनी दिग्दर्शित केलेला १९८१ साली आलेला ‘एक दुजे के लिये’ हा सिनेमा कमल हासन पहिला हिंदी तर एकूण १०० वा सिनेमा होता. या सिनेमातील त्याच्या भूमिकेने तमाम तरुण प्रेमवीरांना प्रेमाचा नवा संदेश दिला. कमल हासनने त्यात तामिळ ततरुण ‘वासू’ची भूमिका केली होती, तर रती अग्निहोत्रीने ‘सपना’ या पंजाबी मुलीची.. त्यांच्या प्रेमाला होणारा विरोध आणि अखेर आत्महत्येत होणारी त्याची परिणती यामुळे ‘वासू-सपना’ ही पात्रं अजरामर झाली.
सदमा
१९८३ साली आलेल्या सदमा सिनेमात कमल हासनने सोमप्रकाश (सोमू)ची भूमिका केली होती. या सिनेमात श्रीदेवीने एक आव्हानात्मक भूमिका केली होती. एका अपघातात रश्मी (श्रीदेवी) चा अपघात होऊन तिची बुद्धी सात वर्षांच्या मुलीची होते. सोमी तिची काळजी घेत तिच्यावर उपचार करतो. मात्र उपचारांनी बरी होताच ती आपल्यावर प्रेम करणारा, काळजी घेणाऱ्या सोमूला विसरून जाते आणि त्याला सोडून निघून जाते. तिला आपली आठवण करून देण्यासाठी सोमू अनेक वेडे वाकडे प्रयत्न करत राहोत, मात्र, ते निष्फळ ठरतात. सिनेमाच्या शेवटी लक्ष वेधून घेण्याकरता कमल हासनने जो काही अभिनय केला आहे, तो निव्वळ लाजवाब... आजही अनेक चाहत्यांच्या स्मरणात तो सीन आहे.
एक नयी पहेली
के बालचंदर यांच्या १९८४ साली आलेल्या एक नयी पहेलीमध्ये कमल हासनने संदीप या श्रीमंत बापाच्या(राजकुमार) तापट मुलाची भूमिका केली होती. संदीप आपल्या वडलांशी भांडून घर सोडून जातो. यावेळी तो एका प्रौढ गायिकेच्या भैरवीच्या (हेमा मालिनीच्या) घरी राहू लागतो आणि तिच्या प्रेमात पडतो. संदीपला पहिला धक्का तेव्हा बसतो, जेव्हा त्याला समजतं, की भैरवीची मुलगी कजरी (पद्मिनी कोल्हापुरे) हिच्याशी आपल्या वडलांचे प्रेमसंबंध आहेत.. या सिनेमात देखील अनेक नामवंत कलाकार असूनही कमल हासनने आपल्या अभिनयाचा ठसै उमटवला.
सागर
१९८५ साली आलेल्या सागर या सिनेमात कमलने राजा या सच्च्या मित्राची भूमिका साकारली. तो आपल्या बालमैत्रिणीच्या (डिंपल कपाडिया) प्रेमात असतो. मात्र ती त्याच्याच एका मित्राच्या (ऋषी कपूर) प्रेमात असल्याचं त्याला समजल्यावर तो आपल्या प्रेमाचा केवळ त्यागच करत नाही, तर मैत्रीसाठी जीवही देतो. या सिनेमातही कमल हासनने आपल्य़ा अभिनयाचा दर्जा दाखवून दिला.
पुष्पक
सिनेमामध्ये नवनवी तंत्रं येत असताना मुकपट निर्माण करण्याचा कुणी विचार तरी करेल का? मात्र या सिनेमात कमल हासन असेल, तर असा सिनेमाही किती सुंदर बनू शकतो, हे दिसून येतं. १९८७ साली आलेल्या पुष्पक सिनेमात एकही संवाद नव्हता. ब्लॅक कॉमेडीच्या अंगाने गेलेल्या या सिनेमात कमल हासनने एका बेरोजगार तरुणाची भूमिका केली होती. एका श्रीमंत माणसाला किडनॅप करून हा तरूण त्याच्या पंचतारांकित हॉटेलातल्या रूममध्ये राहातो, प्रेमात पडतो.. मात्र शेवटी आपल्याच मूळ ठिकाणी परततो. या सिनेमात कमल हासनने केवळ चेहऱ्यावरील हावभावांनी अभिनयाची उत्तुंग पातळी गाठली होती.
नायगन
शक्तीवेलू नायगन या माटुंग्यातील स्मगलरच्या आयुष्यावर बेतलेल्या सिनेमात काम करून कमल हासनने आपल्या चाहत्यांच्य़ा मनात आपल्याबद्दल एक महत्वाचं स्थान निर्माण केलं. गरीबांचा प्रेषित मानला गेलेला नायगन अखेर आपलं गुन्हेगारी विश्व सोडून पोलिसांना शरण जातो, तेव्हा त्याचा एका मनोरुग्णाकडून खून होतो.
नायगन
शक्तीवेलू नायगन या माटुंग्यातील स्मगलरच्या आयुष्यावर बेतलेल्या सिनेमात काम करून कमल हासनने आपल्या चाहत्यांच्य़ा मनात आपल्याबद्दल एक महत्वाचं स्थान निर्माण केलं. गरीबांचा प्रेषित मानला गेलेला नायगन अखेर आपलं गुन्हेगारी विश्व सोडून पोलिसांना शरण जातो, तेव्हा त्याचा एका मनोरुग्णाकडून खून होतो.
अप्पू राजा
१९८९ साली आलेल्या अप्पू राजा सिनेमात कमल हासनने तीन भूमिका केल्या होत्या. वडील आणि दोन जुळी मुलं... लहानपणी हारवून मोठेपणी एकत्र आलेल्या आणि वडलांच्या खुनाचा बदला घेतलेल्या अँग्री यंग मॅनच्या सर्वसाधारण कथेत कमल हासनच्या अभिनयाने वैशिष्ट्यपूर्ण अंग दाखवून दिलं. यातील अप्पूच्या भूमिकेतला कमल हासन ३ फूट उंचीचा असतो. सर्कशीत विदुषक असणारा अप्पू विलक्षण पद्धतीने आपल्या वडलांच्या खुनाचा बदला घेतो. हा सिनेमा पाहाताना कमल हासनच्या अभिनयाला जेवढी दाद देऊ तेवढी थोडी वाटते.
हिंदुस्तानी
१९९६ साली इंडियन (हिंदुस्तानी) या सिनेमातही कमल हासनने दुहेरी भूमिका केल्या होत्या. वडील आणि मुलाच्या. स्वातंत्र्य सैनिक असलेल्या वृद्ध हिंदुस्तानीच्या भूमिकेसाठी त्याने केलेल्या मेक-अप मुळे कुणी त्याला ओळखूच शकत नव्हतं. वृद्ध हिंदुस्तानी भ्रष्टाचाऱ्यांचा खात्मा करत करत अखेर एक दिवस आपल्या भ्रष्ट मुलाचाही (कमल हासन) खून करतो.
चाची ४२०
या सिनेमात कमल हासन असा काही सजला होता की तो खरोखर म्हातारी महाराष्ट्रीयन ब्राह्मण बाई वाटत होता. आपल्या बायकोशी घटस्फोट झाल्यावर आणि मुलीपासून ताटातूट झाल्यावर त्यांना भेटण्याची संधी म्हणून तो म्हाताऱ्या बाईच्या वेषात घरामध्ये शिरतो आणि आपल्या मुलीची आया म्हणून काम करू लागतो. मात्र या मध्ये त्याचाच सासरा बाई वेषातील जयप्रकाश (कमल हासन)च्या प्रेमात पडतो आणि धमाल सुरू होते. या सिनेमातील कमल हासनचं टायमिंग आणि वेषांतराची गंमत पाहून हसता हसता पुरेवाट होते.
हे राम
२००० साली आलेल्या या सिनेमात कमल हासनने १९४७ साली गांधीवधासाठी पेटून उठलेला हिंदू तरूण रंगवला होता. गांधींचं तत्वज्ञान एक वेगळ्या दृष्टिकोनातून या सिनेमात मांडलं होतं. मात्र या सिनेमाचा विषय सर्वसामान्य लोकांना झेपला नाही आणि सिनेमा फारसा चालला नाही.
दशावतारम
२००८ साली आलेल्या दशावतारम सिनेमात कमल हासनने १० भूमिका केल्या होत्या. यात माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश, हिरो, म्हातारा खलनायक, उंच माणूस, पंजाबी गायक, म्हातारी अयंगार विधवा इत्यादी अनेक भूमिका केल्या. प्रत्येक भूमिकेसाठी कराव्या लागणाऱ्या मेकअपसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत होती. एकाच सिनेमात एवढे वेगवेगळ्या भूमिका करून त्याने दाखवून दिलं की ‘या सम हा’च
/marathi/slideshow/अभिनयाचा-महामेरू-कमल-हासन_162.html/4