परवडणारी किंमत...
आय फोन आता नव्या स्वरुपात बाजारात दाखल होण्याच्या मार्गावर आहे... आय फोन ‘फाईव्ह एस’ आणि आय फोन ‘फाईव्ह सी’ हा नेक्स्ट जनरेशन आणि तुलनेत थोडा स्वस्त असणार आहे. १० सप्टेंबर २०१३ पर्यंत बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.
फोर्थ-जनरेशन
‘अॅपल’ ही कंपनी वर्षाच्या सुरुवातीलाच १२८ जीबीचा फोर्थ-जनरेशन आय-पॅड मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत होती. पण, आय-पॅडऐवजी आता १२८ जीबीच्या आय-फोनसहीत कंपनी बाजारात उतरणार आहे.
थम्ब रीडर
तुमच्या बोटांचे ठसे हा फोन वाचू शकतो.
‘ए-७’ चीप
‘ए-७’ चीप ही या फोनची खासियत... कंपनीचा पुढच्या पिढीचा फोन हा ‘ए-७’ चीपचा असेल हे कंपनीनं आधीच स्पष्ट केलं होतं. सध्या आय-फोनमध्ये वापरात असलेल्या ए-६ या चीपपेक्षा ए-७ ही चीप ३१ टक्के फास्ट असणार आहे.
‘कुओ’चं भाकीत
या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विश्लेषक म्हणून ओळखला जाणाऱ्या मिंग-ची कुओ यानं आय-फोन फाईव्ह एस हा ए-७ चीप सहित एक जीबी LPDDR3 रॅमसहीत असेल असं भाकित वर्तवलं होतं. त्याचं हे भाकित खरं ठरलंय.
मोठं अपर्चर...
कुओ याच्या म्हणण्यानुसार, आय फोन ‘फाईव्ह एस’ हा F2.0 अपर्चरमध्ये उपलब्ध असेल... आय फोन फाईव्ह F2.4 अपर्चर वापरण्यात आलंय.
/marathi/slideshow/आय-फोन-फाईव्ह-एस…-लवकरच_261.html/4