सॅमसंग गॅलक्सी एस४ (Samsung Galaxy S4)
पहिली किंमत: ४१,५०० रुपये
आताची किंमत: २७,९०० रुपये
सॅमसंग गॅलक्सी एस ५ बाजारात आल्यानंतर सॅमसंग गॅलक्सी एस४च्या किंमतीमध्ये चांगलीच कमी आली आहे. या किंमतीमध्ये सॅमसंग गॅलक्सी एस४ हा चांगलाच पावरफुल फोन
आहे. यामध्ये क्वाड-कोर एग्जिनॉस प्रोसेसर, २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल स्टॉरेजची क्षमता आहे. याचा १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा हा इतर कॅमेऱ्यापेक्षा चांगला मानला जातो.
यामध्ये ५ इंचची फुल एचडी एमोलेड डिस्प्ले स्क्रिन आहे.
स्पाइस पिनॅकल FHD M-५२५ (Spice Pinnacle FHD Mi-525)
पहिली किंमत: १९,९९० रुपये
आताची किंमत: ९,९९९ रुपये
५ इंच फुल एचडी डिस्प्ले स्क्रिन (१९२०x१२८०)चा हा पहिला बजेट फोन होता. या किंमतीवर फुल एचडी डिस्प्ले स्क्रिन देणारा हा सगळ्यात स्वस्त फोन आहे. यामध्ये १.५ गीगाहर्ट्स
क्वॉड-कोर प्रोसेसर, १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल स्टॉरेज, ड्यूल कॅमेरा (८ मेगापिक्सल्स मागे आणि २ मेगापिक्सल्स पुढे) आणि सॉफ्टवेअर फीचर्स (इंटेलिजेंट आंसर, फ्लिप टु म्यूट,
डायरेक्ट कॉल) आहे. जे महाग स्मार्टफोन मध्येच मिळतात. या सोबत स्पाइस क्लाउडवर २ जीबीपर्यंत मोफत स्टॉरेज सर्विस देखील मिळते.
सॅमसंग गॅलक्सी नोट ३ निओ (Samsung Galaxy Note 3 neo)
पहिली किंमत: ३८,९९० रुपये
आताची किंमत: ३३,९९९ रुपये
सॅमसंग गॅलक्सी नोट ३ निओमध्ये १२८०x७२० पिक्सल्स रेजॉलूशनचा ५.५ इंच सुपर एमोलेड एचडी डिस्प्ले स्क्रिन आहे. यामध्ये १.६ गीगाहर्ट्सचा क्वॉड-कोर किंवा हेक्सा-कोर प्रोसेसर
(१.७ गीगाहर्ट्स ड्यूल-कोर कोर्टेक्स A१५ + १.३ गीगाहर्ट्स क्वॉड-कोर कोर्टेक्स A७) आणि २ जीबी रॅम आहे. याची ऑपरेटिंग सिस्टम ऐंड्रॉयड ४.३ (जेली बीन) आहे.
यामध्ये बीएसआई सेंसर आणि एलईडी फ्लॅश सोबतच ८ मेगापिक्सल्स कॅमरा आहे. जो १०८० पिक्सल्स व्हिडिओ देखील शूट करु शकतो. यामध्ये २ मेगापिक्सल्सचा पुढचा कॅमेरा आहे.
यामध्ये 3G आहे. एचएसपीए+, वाई-फाई, ब्लूटूथ (४.०), जीपीएस/ GLONASS आणि एनएफसी देखील आहे. यात १६ जीबी इंटरनल मेमरी आहे आणि ६४ जीबी पर्यंत मेमरी कार्ड
वाढवण्याची क्षमता आहे. या सोबत एस पेन स्टासलस देखील उपलब्ध आहे.
अॅपल आय पॅड मीनी (१६ जीबी वाय फाय) (Apple iPad Mini (16GB WiFi)
पहिली किंमत: २१,९०० रुपये
आताची किंमत: १६,९९९ रुपये
हा छोटा टॅबलेट बाजारात आल्यानंतरच खूप कामाचा आणि लोकप्रिय मानला जातो. यामध्ये नवीन आईओएस ७ आहे. याचा परफॉर्मंस चांगला आहे. चांगली स्क्रिन आहे. याच्या अॅप
स्टोरमध्ये वापरण्यात येणारे खूप अॅप आहेत. डिजाइन आणि मटेरिअलची बांधणी चांगली आहे.
लिनोवो के ९०० (Lenovo K900)
पहिली किंमत: ३२,९९९ रुपये
आताची किंमत: २१,००० रुपये
दोन महिन्यांपूर्वी आलेल्या लिनोवो वाइब झी ९००च्या आधी के ९०० हा कंपनीचा आघाडीचा स्मार्टफोन होता. के ९०० आतापण खूप दमदार फोन आहे. यामध्ये २ गीगाहर्ट्स ड्यूल-कोर
इंटेल ऐटम प्रोसेसर आहे. २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. ड्यूल-एलईडी फ्लॅश आणि एफ १.८ अपर्चर सोबत १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा आहे. यात ५.५ इंच फुल एचडी
डिस्प्ले आहे. स्टेनलेस स्टील बॅक आणि मेटल स्क्रू यामुळे हा स्मार्टफोन वेगळाच दिसतो.
सॅमसंग गॅलक्सी नोट २ (Samsung Galaxy Note II)
पहिली किंमत: ३९,९०० रुपये
आताची किंमत: २७,००० रुपये
काही दिवसांपूर्वी नोट ३च्या लाँच होण्यानंतर सॅमसंगने नोट २ची किंमत कमी केली आहे.
यात नोट २ची सर्व खासीयत नाही, पण यात चांगला असा प्रेशर सेंसेटीव स्टइलस आहे. यात वाकॉम पेन टेक्नॉलजी आहे, जी ५.५ इंच डिस्प्लेवर चांगला प्रतिसाद देते.
यात एग्जिनॉस क्वॉड-कोर प्रोसेसर, २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. ८ मेगापिक्सल्सचा चांगला कॅमेरा आहे.
नेक्सस ७ (३२ जीबी) (Nexus 7 (32GB)
पहिली किंमत: १९,९९० रुपये
आताची किंमत: १०,९९९ रुपये
गूगल नेक्सस डिवाइस खूपच जोरात असतात. कारण त्यात विनाकारण असे एनिमिशन आणि प्री-लोडेड ब्लॉटवेयर ऐप नसतात.
कदाचित याच कारणाने नेक्सस ७ (३२ जीबी) हा अजून देखील चांगला विकला जात आहे.
यात चांगली डिस्प्ले स्क्रिन, रिस्पॉन्सिव टचस्क्रीन, एनवीडिया टेग्रा ३ क्वॉड-कोर प्रोसेसर, १ जीबी रॅम, एनएफसी, जीपीएस, वाय-फाय आणि उत्तम बॅटरी आहे, जी १० तास चालू शकते.
एल जी २ (LG G2)
पहिली किंमत: ४१,५०० रुपये
आताची किंमत: ३२,००० रुपये
आज देखील एल जी २च्या टॉप स्मार्टफोन्स मध्ये खूप नवीन फीचर्स आहेत. हा काही अशा स्मार्टफोन्स पैकी आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबेलाइजेशन (जे ब्लर शॉट्स) कमी करतात.
यात ५.२ इंच फुल एचडी आईपीएस+ डिस्प्ले स्क्रीन, क्वॉड-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८०० प्रोसेसर, २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल स्टॉरेज आहे.
ब्लॅकबेरी झी १० (BlackBerry Z10)
पहिली किंमत: ४३,९९० रुपये
आताची किंमत: १७,९९० रुपये
Z10 पहला ब्लॅकबेरी १० डिवाइस होता. यात ४.२ इंच एचडी टचस्क्रीन होती.
यात ब्लॅकबेरीचा सगळ्यात उत्तम असा कॅमरा आहे. बॅटरी लाईफ चांगली आहे. १.५ गीगाहर्ट्स ड्यूल-कोर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल स्टोरेज आहे.
/marathi/slideshow/कमी-बजेटमधले-टॉप-स्मार्टफोन्स_321.html/5