टॉप २० भारतीय महिला
`गुगल` या सर्च इंजिनवर या नावांवर केलं गेलं सर्वात जास्त सर्च... भारतातील कोणकोणत्या महिलांचा समावेश आहे या यादीत... पाहुयात...
ऐश्वर्या राय - बच्चन
गुगलच्या या यादीत सर्वात वरचा क्रमांक लागतो तो बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय - बच्चन हिचा... माजी मिस वर्ल्ड आणि उत्तम अभिनेत्री, अमिताभ बच्चन यांची सून, अभिनेता अभिषेक बच्चन याची पत्नी अशा अनेक भूमिका सध्या ऐश्वर्या पेलवताना दिसतेय.
विद्या बालन
२०१४ वर्षातील जानेवारी फेब्रुवारी या पहिल्या दोन महिन्यांच्या आकडेवारीच्या पाहणीनंतर ही यादी जाहीर करण्यात आलीय. यामध्ये अभिनेत्री विद्या बालन हिचा दुसरा क्रमांक लागतो
सोनिया गांधी
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचा या यादीत तिसरा क्रमांक लागतो.
जे. जयललिता
एका राजकीय पक्षाच्या नेत्या जे. जयललिता या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत.
सायना नेहवाल
बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं या यादीत पाचवा क्रमांक मिळवलाय.
एकता कपूर
फिल्म आणि टेलिव्हिजन प्रोड्युसर एकता कपूर या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे
किरण बेदी
माजी भारतीय पोलीस अधिकारी किरण बेदी यांनाही या यादीत स्थान मिळालंय. त्या सातव्या क्रमांकावर आहेत.
ममता बॅनर्जी
राजकीय नेत्या ममता बॅनर्जी यांचा या यादीत आठवा क्रमांक लागतो.
निता अंबानी
बिझनेसवुमन निता अंबानी आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी... या यादीत नवव्या क्रमांकावर आहेत.
सुषमा स्वराज
भाजप नेत्या सुषमा स्वराज या यादीत दहाव्या क्रमांकावर आहेत
अरुंधती रॉय
लेखिका अरुंधती रॉय यांचा या यादीत अकरावा क्रमांक लागतो.
रितू कुमार
फॅशन डिझायनर रितू कुमार या यादीत बाराव्या क्रमांकावर आहेत
शबाना आझमी
बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी यांनी या यादीत तेराव्या क्रमांकावर स्थान मिळवलंय.
निता लूल्ला
फॅशन डिझायनर निता लूल्ला या चौदाव्या क्रमांकावर आहेत
मिरा नायर
दिग्दर्शक मिरा नायर यांचा या यादीत पंधरावा क्रमांक लागतो
इंद्रा नुयी
पेप्सिको कंपनीच्या सीईओ इंद्रा नुयी या यादीत सोळाव्या क्रमांकावर आहेत
मेरी कोम
बॉक्सर एम सी मेरी कोम यांचा सतरावा क्रमांक लागतो
शोभा डे
लेखिका शोभा डे या यादीत अठराव्या क्रमांकावर आहेत
शिखा शर्मा
आहारतज्ज्ञ शिखा शर्मा या यादीत एकोणविसाव्या नंबरवर आहेत
डिंपल यादव
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव यांचाही या यादीत समावेश आहे. १५ व्या लोकसभेच्या सदस्यांपैंकी एक असलेल्या डिंपल या कन्नूजमधून निवडून आल्यात.
/marathi/slideshow/गुगल-मधील-चर्चित-भारतीय-महिला-२०१४_310.html/5