भारताचे काही ग्लोबल चेहरे...
जयपूरमध्ये जन्मलेले अंशू जैन असो वा इंद्रा नुयी... भारतात मूळ असलेली अशी कित्येक नावं आहेत, ज्यांनी आत्तापर्यंत ज्यांनी जगातील ‘बोर्डरुम्स’मध्ये बदलाव घडवून आणलेत... आपल्या दूरदृष्टी, एकाग्रता आणि निर्णयक्षमतेनं त्यांनी आपापल्या क्षेत्राला ‘सातव्या आसमाना’त नेऊन ठेवलं. सर्व्हिस सेक्टर, बँकिंग, अर्थ किंवा आय टी... सगळ्याचं क्षेत्रात त्यांनी आपल्या बहुमूखी प्रतिभेनं सगळ्या जगाचेच डोळे दिपवले आहेत. त्यामुळेच ते भारताचा अभिमान ठरले आहेत... पाहुयात, कोण कोण आहेत हे चेहरे...
अंशू जैन
कंपनी / हेडक्वार्टर – ड्यूश बँक, जर्मन
वय – ४९ वर्ष
शिक्षण –
बॅचलर्स - दिल्ली महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात पदवी (BA in Economics)
मास्टर्स – मॅन्सॅच्युसेटस् महाविद्यालयातून ‘अर्थ’ या विषयात एमबीए (MBA in Finance)
पद – १ जून २००२ पासून ड्यूश बँकेच्या सीईओ पदावर कार्यरत
योगदान – ड्युश बँकेच्या आपल्या १७ वर्षांच्या कार्यकाळात डेरेव्हेटिव्ह मार्केटमध्ये कंपनीला त्यांनी एका उच्च स्थानावर नेऊन ठेवलं, ही गोष्ट कंपनीच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांनीदेखील कबूल केलीय. प्रतिकूल परिस्थितीत जोखीम घेऊन आपलं वर्चस्व या कंपनीनं अंशु यांच्या कार्यकाळात सिद्ध केलंय.
कंपनीचा टर्नओव्हर – ३३,२२८ मिलियन युरो.
अजय बंग
कंपनी – मास्टरकार्ड, न्यूयॉर्क, अमेरिका
वय – ५२
शिक्षण –
बॅचलर्स – दिल्लीतल्या सेन्ट स्टिफन्स महाविद्यालयातून ‘अर्थशास्त्र’ या विषयात पदवी (BA Honors In Economics)
मास्टर्स – अहमदाबाद आयआयटी महाविद्यातून एमबीए
पद – १ जुलै २०१० रोजी ‘चीफ एक्झिक्युटीव्ह’ पद केलं ग्रहण
योगदान – ‘मास्टरकार्ड’नं २०१२ मध्ये आपल्या उत्पन्नात २१ टक्के वाढ पहिल्या ६ महिन्यांतच घडवून दाखवली. १.७६ बिलियन युएस डॉलर भांडवलासहित त्यांनी ही वाढ घडवून आणली होती. २००६ मध्ये सार्वजनिक क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर कंपनीनं पहिल्यांदाच एका सत्रात इतकी मोठी वाटचाल केली होती.
कंपनीचा टर्नओव्हर – ६,७१४ बिलियन यूएस डॉलर
विक्रम पंडित
कंपनी – सीटी ग्रूप, न्यूयॉर्क, अमेरिका
वय – ५५
शिक्षण-
बॅचलर्स – कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून ‘बीएस’ पदवी
मास्टर्स – कोलंबियामध्ये इंजिनिअरिंगमध्ये ‘एमएस’ आणि ‘अर्थ’ या विषयात पीएचडी
पद – ११ डिसेंबर २००७ मध्य सिटी बँकेच्या चेअरमन आणि सीईओपदी विराजमान
योगदान – २०११ मध्ये सिटी बँकेनं कन्झ्युमर बँकांमध्ये अग्रस्थान मिळवलं. अनेक पुरस्कार या काळात बँकेनं पटकावले. आपल्या छोट्या व्यवसायाला वृद्धींगत करत त्यांनी पेक्षा ७२ टक्क्यांनी नफा मिळवत २०११ मध्ये ७.९ बिलियन यूएस डॉलरची कमाई केली.
टर्नओव्हर - ६५,८१४ मिलियन यूएस डॉलर (वार्षिक)
शंतनू नारायेन
कंपनी – अॅडॉब, कॅलिफोर्निया, अमेरिका
वय – ४९
शिक्षण –
बॅचलर्स – भारतातल्या उस्मानिया युनिव्हर्सिटीमधून ‘इलेक्ट्रॉनिक्स’ इंजिनिअरिंग आणि बॉलिंग ग्रीन स्टेट युनिव्हर्सिटीमधून कम्प्यूटर सायन्स
मास्टर्स – ‘हॅस् स्कूल ऑफ बिझिनेस’मधून एमबीए
पद – डिसेंबर २००७ मध्ये ‘अॅडॉब’च्या ‘सीईओ’पदी वराजमान
योगदान –भारतातच जन्मले आणि वाढलेही शंतनु नारायण अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांचं योगदान ‘अॅडॉब’मध्ये दोनदा महत्त्वाचं ठरलं.
१. २००५ मध्ये ३.४ बिलियन डॉलर्सला ‘मायक्रोमीडिया’ कंपनी ताब्यात घेतली.
२. तर २००९ मध्ये १.८ बिलियन डॉलर्सला ‘ओमीलिओनिचर’वर ताबा मिळवला.
टर्नओव्हर – ४,२१६ मिलियन यूएस डॉलर्स (वार्षिक)
इंद्रा नुयी
कंपनी – पेप्सिको, न्यूयॉर्क, अमेरिका
वय – ५७
शिक्षण –
बॅचलर्स – मद्रास ख्रिश्चन महाविद्यालयातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात पदवी.
मास्टर्स – कलकत्याच्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटमधून १९७६ साली ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट’ तर येले स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून ‘पब्लिक अॅन्ड प्रायव्हेट मॅनेजमेंट’मध्ये डिग्री मिळवली.
पद – इंद्रा नुयी या २००६ पासून ‘पेप्सिको’च्या सीईओ पदावर कार्यरत आहेत.
योगदान – इंद्रा नुयी यांनी पेप्सिकोच्या दोन महत्त्वाच्या निर्णयात आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. १९९८ मध्ये नुयी यांनी ट्रोपिकाना ऑरेंज ज्युस ब्रँडला टेकओव्हर करण्यासाठी तब्बल ३.३ बिलियन डॉलर्सची डील पक्की केली आणि दोन वर्षांनंतर टीममधला एक हिस्सा म्हणून त्यांनी १४ अरब अमेरिकन डॉलर्स कंपनीसाठी सुरक्षित केले. ‘कोकोकोला’ कंपनीला ताब्यात घेण्यातही इंद्रा नुयी यांचं योगदान महत्त्वाचं ठरलं.
टर्नओव्हर – ६६,५०४ मिलियन यूएस डॉलर्स (वार्षिक)
अभिजित तळवळकर
कंपनी – एलएसआय लॉजिक ग्रूप, कॅलिफोर्निया, अमेरिका
वय – ४८
शिक्षण –
‘ओरेगॉन स्टेट युनिव्हिर्सिटी’मधून बॅचलर्स आणि मास्टर्स डिग्री मिळवली
पद – अभिजीत तळवळकर या मराठमोळ्या तरुणानं मे २००५ मध्ये ‘एलएसआय’चं अध्यक्षपद आणि ‘सीईओ’पद हातात घेतलं.
योगदान – २०११ मध्ये ‘एलएसआय’नं ग्राहकांना एक टेराबाईटची हार्ड ड्राईव्ह उपलब्ध करून देऊन प्रोद्योगिक क्षेत्रात आपलं प्रभूत्व सिद्ध केलं.
तसंच २८ नॅनोमिटरचं चॅनेल उपलब्ध करून ‘एलडीपीसी’वर प्रभुत्व मिळवून स्पर्धेत ‘एलएसआय’नं बाजी मारली.
टर्नओव्हर – २,०४४ मिलियन यूएस डॉलर (वार्षिक)
/marathi/slideshow/ग्लोबल-भारताचे-शिलेदार_105.html/4